Friday , November 6 2026
Breaking News

मुंबई-बंगळुरू प्रवास होणार अधिक वेगवान; देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ अंतिम चाचणी टप्प्यात

Spread the love

 

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन अंतिम चाचणी टप्प्यात दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) यांनी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF)च्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन तयार केली आहे. ग्रे आणि ऑरेंज रंगसंगतीतील ही ट्रेन रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विशेष डिझाइन करण्यात आली असून ताशी 180 किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे.

या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असून 823 प्रवाशांची क्षमता आहे. त्यामध्ये 11 एसी 3-टियर (611 बर्थ), 4 एसी 2-टियर (188 बर्थ) आणि 1 फर्स्ट एसी डब्याचा समावेश आहे. डब्यांमध्ये कमी कंपन आणि आवाज, आधुनिक शौचालये, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही, पूर्ण वातानुकूलन, ‘कवच’ सुरक्षा प्रणाली आणि आपत्कालीन ‘टॉक-बॅक’ सुविधा देण्यात आली आहे.

या मार्गावर बेळगाव, हुबळी-धारवाड आणि पुणे येथील प्रवाशांनाही मोठा लाभ होणार असून मुंबई-बंगळुरू प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी 2026 मध्ये हावडा–कामाख्या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई–बंगळुरू मार्गावरील ही दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत दाखल होण्याच्या तयारीत असून, अंतिम चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून अधिकृत उद्घाटनाची घोषणा केली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *