Sunday , September 20 2026
Breaking News

बलात्कार करून धर्मांतराचा प्रयत्न; दोषीला जन्मठेपेची शिक्षा

Spread the love

 

बेळगाव : अनुसूचित जातीतील महिलेवर बलात्कार करून अश्लील छायाचित्रांच्या माध्यमातून धमकावत तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी रफीक बेपारी याला बेळगाव येथील तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सवदत्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करत शिक्षा जाहीर केली.

न्यायालयाने बलात्कार प्रकरणात जन्मठेप आणि 1 लाख रुपयांचा दंड, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत 5 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपयांचा दंड, तसेच कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य हक्क संरक्षण कायद्यान्वये 5 वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

याशिवाय, पीडित महिलेला 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत.

या प्रकरणात सरकारी वकील आर. जी. देवरड्डी यांनी बाजू मांडली.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *