Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मराठी, इंग्रजी फलक हटवण्यासाठी मनपावर करवेचा दबाव

  बेळगाव : शहरात गणेशोत्सव आणि दसरोत्सवामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेत फलक लागले असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या करवे यांनी शुक्रवारी (दि. ४) पुन्हा कोल्हेकुई करत महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल यांच्या वाढदिवसाच्या फलकावर कन्नड फलक लावून कंडू शमवून घेतला. शहर परिसरात मराठी आणि इंग्रजी …

Read More »

शिरोली वृक्षतोडीबाबत सखोल चौकशी करावी

  खानापूर : लोंढा वन क्षेत्रामध्ये शिरोली ग्रामपंचायत सर्व्हे क्रमांक ९७ मध्ये बेकायदा ११ जातीच्या वृक्षांची दहा दिवसांपूर्वी तोड करण्यात आली. याबाबत तक्रार दाखल करण्यास वनविभागाकडून विलंब होत आहे. याप्रकरणी सरकारने उच्चस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करून सखोल चौकशी करावी, याबाबत वनमंत्र्यांना खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी करणार …

Read More »

छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा

  नारायणपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षा …

Read More »

हिंडलगा ग्राम पंचायतीने केली मालमत्ता करात १० टक्के वाढ

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने मालमत्ता करात १० टक्के वाढ केल्याने ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप व्यक्त केला. हिंडलगा गावात मालमत्ता करात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे हित न जपणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा काय उपयोग असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ग्रा पं सदस्यांनी …

Read More »

दुर्गामाता दौडीमुळे निपाणी शिवमय

  तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व उत्साह ; शिवाजी महाराजांच्या वेषात स्वागत निपाणी (वार्ता) : दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या, पुष्पष्टी, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, युवकांसह बालचमूंचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी (ता.४) येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची दुर्गामाता दौड काढण्यात आली. यावेळी युवकांसह युवतींनी भगवे फेटे परिधान केल्याने निपाणी शिवमय बनली होती. …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निपाणी परिसरात आनंदोत्सव

  निपाणी (वार्ता) : मराठी ही मुळातच अभिजात भाषा असतानाही त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता.‌ या संदर्भात केंद्र शासनाचे जे निकष असतात ते निकष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यास करून आवश्यक सर्व अटींची पूर्तता करून केंद्र शासनाला आपला …

Read More »

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल चलवेनहट्टीत आनंदोत्सव

  बेळगाव : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल चलवेनहट्टी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मनोहर हुंदरे यांनी अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकार तसेच मराठी साहित्यिकांच्या वतीने अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते पण ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला …

Read More »

येळ्ळूर केंद्रातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार

  बेळगाव : येळ्ळूर केंद्राच्यावतीने आयोजित केंद्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बी. आर.सी. प्रमुख डॉ. एम्. एस्. मेदार, केंद्र प्रमुख महेश जळगेकर, मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक आर्. एम्. चलवादी, येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक एम.बी. पाटील, कन्नड येळ्ळूरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका …

Read More »

धारवाड येथून विक्रीसाठी आणलेला गांजा बेळगाव पोलिसांनी केला जप्त

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कबलापुर गावात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात बेळगाव सीईएन पोलिसांना यश आले आहे. धारवाड सत्तूर निवारा कॉलनीत राहणारा समीर राजेसाब लथेम्मा हा बेळगाव तालुक्यातील कबलापूर गावातील कल्याळ पूलजवळ गोकाका-बेळगाव रस्त्यावर गांजा विकण्यासाठी आला होता. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपींच्या …

Read More »

दक्षिण उपनोंदणी कार्यालयाला वकिलांचा घेराव!

  बेळगाव : बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात सुरू असलेला एजंटांचा दरबार आणि सर्वसामान्यांसाठी अवलंबल्या जाणाऱ्या विलंबाची धोरणाच्या निषेधार्थ आज बेळगाव येथील वकील संघटनेने दक्षिण उपनोंदणी कार्यालयाला घेराव घालून संताप व्यक्त केला. दक्षिण उपनिबंधक कार्यालय, बेळगाव येथील कर्मचारी प्रलंबित काम करत आहेत. एजंटांचे काम करणारे कर्मचारी जनतेची कामे करण्यात दिरंगाईचे धोरण …

Read More »