बेळगाव : दि. 20 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या 6व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचा आज उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून पंजाब, हरियाणा, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या विविध राज्यांमधून एकूण सुमारे 1200 हून अधिक कराटेपटू सहभागी झाले आहेत. या कराटे स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. रमाकांत कोंडुसकर, …
Read More »कणगल्याजवळ बर्निंग ट्रकचा थरार
बग्यास वाहतुकीच्या ट्रकला शॉर्टसर्किटने आग ; लाखोंचे नुकसान निपाणी (वार्ता) : निपाणी येथून गोकाककडे बग्यास भरून जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणगला जवळ शनिवारी (ता.२०) सायंकाळी साडेचार वाजता घडली. या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी ट्रकच्या पुढील भागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निपाणी आणि संकेश्वर येथील …
Read More »निपाणीत दोन ठिकाणी घरफोडी करून ४ लाखाची चोरी
निपाणीत चोरट्यांचे सत्र सुरूच; शहरवासीय भीतीच्या छायेखाली निपाणी(वार्ता) : गेल्या महिन्यापासून शहर आणि उपनगरात चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मात्र एकाही घटनेच्या तपास लागला नसताना पुन्हा शुक्रवारी (ता.१९) रात्री भीमनगर आणि उपनगरात येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व …
Read More »देशाची सक्षम भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षण संस्थांनी करावे : खासदार तेजस्वी सूर्या
बेळगाव : शिक्षण क्षेत्रात अनेक अमुलाग्रह बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी पदवी घेऊन नोकरी व्यवसाय करणे हे एकच ध्येय पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होते. मात्र आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळात विद्यार्थ्यांना अनेक यशस्वी जीवन घडविण्याच्या अनेक संधी प्राप्त झालेल्या आहेत. शैक्षणिक संस्थांनाही एका साच्यातील शिक्षणाऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांवर आधारित शिक्षणांवर भर …
Read More »कॅपिटल वन करंडकाचे उत्स्फूर्त अनावरण
बेळगाव : सलग १४ व्या वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी सुरू असलेल्या एकांकिका स्पर्धेदरम्यान करंडकाचे अनावरण अमाप उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री प्रमोद काळे, वामन पंडीत, व सुनील खानोलक यांच्या बरोबर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्हा. चेअरमन शाम सुतार उपस्थित होते. प्रारंभी श्री चेअरमन हंडे यांनी …
Read More »मलिग्रे येथील तरुण डॉक्टरचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
सांगली कोल्हापूर महामार्गावरील तावडे हॉटेल नजिक अपघात नेसरी (संजय धनके) : आजरा तालुक्यातील मलिग्रे गावचे प्रसाद उर्फ बाबू दिनकर बुगडे (वय 26) सध्या राहणार सांगली या तरुण डॉक्टरचा सांगली कोल्हापूर महामार्गावर तावडे हॉटेल नजिक आज शनिवार दि. 20 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान ट्रकच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसाद बुगडे …
Read More »निपाणी तालुका डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. प्रमोद निळेकर
उपाध्यक्षपदी ऐनापुरे : संस्थेच्या पदाधिकारी निवडी जाहीर निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका डाॅक्टर्स असोसिएशन संलग्नित एएफआय कर्नाटक या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रमोद निळेकर,निपाणी तर उपाध्यक्षपदी डॉ. गजानन ऐनापुरे, निपाणी, सेक्रेटरीपदी डॉ. सचिन हजारे, शिरगुपी तर खजिनदारपदी डॉ. आयुब परकुटे, खडकलाट यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची पदाधिकारी निवडीबाबत नुकतीच बैठक …
Read More »बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात खासदार धैर्यशील माने यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
बेळगाव : “बेळगाव वार्ताचा इम्पॅक्ट” काल बेळगाव वार्ता मधून खासदार धैर्यशील माने यांना हक्कभंगाचा प्रस्ताव कधी याबाबत प्रश्न विचारला असता तात्काळ खासदार धैर्यशील माने बेळगावचे उपायुक्त व जिल्हा दंडाधिकारी आयएएस मोहम्मद रोशन यांनी घटनात्मक हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्क भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे …
Read More »ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या …
Read More »राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे उद्या मराठा वधू-वर मेळावा
बेळगाव : राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावतर्फे उद्या रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य मराठा वधू-वर मेळावा बेळगाव शहरातील रूपाली कन्वेंशन सेंटर, जुना धारवाड रोड येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक मराठा विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta