Sunday , September 20 2026
Breaking News

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

Spread the love

 

मुंबई :  ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने कांग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. मात्र आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण
शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई या ए.आर अंतुलेच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.

दोघांचेही दुसरे लग्न
शालिनीताई आणि वसंतदादा यांनी एकमेकांसोबत दुसरे लग्न केले होते. शालिनीताईंचे पहिले लग्न एका विद्ववान न्यायाधीशासोबत झाले होतेस मात्र लग्नानंतर काही कालावधी उलटल्यानंतर त्यांचे निधन झाले. ताई ऐन तारूण्यात विधवा व एकाकी झाल्या. ताई त्या काळात बॅरिस्टर झाल्या. त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी मिळाली. मुख्यमंत्री वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंत दादांच्या पहिल्या पत्नी आजारी असायच्या. त्यामुळे शालिनीताईंसोबत लग्न करण्याचा विचार वसंतदादांच्या मनात आला. त्यानंतर या दोघांचे लग्न मुंबईत पार पडले. या विवाहाला मर्यादित लोक उपस्थित होते. यावरून दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला. मात्र दोघांनीही याकडे दुर्लक्ष करत जनतेची सेवा सुरू ठेवली.

 

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *