बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनांमृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त सोमवारी श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटे 4.30 वा. मंगल आरती, त्यानंतर दर्शन आरती, भगवंताच्या जन्माबाबतची पार्श्वभूमी सांगणारे परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन सकाळच्या सत्रात झाले. त्यानंतर दिवसभरात …
Read More »गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील रस्त्याची डागडुजी निकृष्ट दर्जाची!
बेळगाव : गणेशोत्सव निमित्त महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील रस्त्याची डागडुजी करत आहे ती अत्यंत चुकीच्या प्रकारे कंत्राटदार करत आहेत. रविवारी रात्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पाहणी करताना ही बाब निदर्शनास आली असुन कंत्राटदारांना याचा जाब विचारला. शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेल्या मागणीनुसार महापालिकेकडून शहरातील खड्डे पडून …
Read More »येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने हेस्कॉमचे कर्मचारी यल्लाप्पा गौंडाडकर यांचा सत्कार
येळ्ळूर : नोकरीला नोकरी न मानता ती एक सामाजिक बांधिलकी आहे, असे मानत सतत कामामध्ये कार्यरत असणारे येळ्ळूर येथील हेस्कॉमचे निवृत्त कर्मचारी यल्लाप्पा गुंडू गौंडाडकर यांचा येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रस्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी …
Read More »मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी साजरी
बेळगाव : नेहमी कडक शिस्तीत कवायत करत असलेले, नेमबाजीचा सराव करणारे सैनिक आज दहीहंडी खेळताना पाहायला मिळाले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आणि दहीहंडी अपूर्व उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला. मिलिटरी महादेव मंदिर येथे मध्यरात्री देवकीनंदन भगवान श्री कृष्णाच्या जन्म सोहळ्याने या उत्सवाची सुरुवात झाली. त्या …
Read More »राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
मालवण : नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक …
Read More »“बेळगावच्या एकदंत”चा मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात पार
बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 26/8/24 रोजी सकाळी मुहूर्तमेढ करण्यात आले. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरजूंना आर्थिक मदत करून मंडळ हे आपल्या समाजासाठी कायतरी देणं लागत यासाठीच हे सर्व उपक्रम राबवणार आहोत असे मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे …
Read More »निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार विशाल पाटील यांची भेट
निपाणी (वार्ता) : सांगली येथील खासदार विशाल पाटील यांची निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान सीमा प्रश्नसंदर्भात चर्चा करण्यात आली. समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सीमाप्रश्न १९५६ पासून ताटकळत आहे, तो सुटावा म्हणून निवेदन देण्यात आले.सन २००४ पासून प्रलंबित असलेला …
Read More »श्रीराम सेना गोकाक तालुका प्रमुखावर चाकूहल्ला
बेळगाव : श्रीराम सेनेचे जिल्हा मुख्य सचिव आणि गोकाक तालुकाप्रमुख रवी पुजारी (वय २७) यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोकाक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. रवी पुजारी हे दोन दिवसांपूर्वी गोकाक शहरातील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण करत असताना त्या …
Read More »पडलेल्या भिंतीचे ढिगारे हटवण्याची मागणी
बेळगाव : पावसामुळे शेजारच्या घराची भिंत आमच्या ये-जा करण्याच्या वाटेत पडल्याने अडथळा निर्माण झाला आहे. हा अडथळा दूर करून जीर्ण इमारतीचा धोकादायक भाग पाडून द्यावा, अशी मागणी गोंधळी गल्लीतील रहिवासी व निवृत्त शिक्षिका शशिकला नेवगी यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली आहे. इमारत १०० वर्षे जुनी असून त्यात …
Read More »जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
सभासदांना 15% लाभांश जाहीर बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी नियमित, मण्णूर या संस्थेची 7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक एल. के. कालकुंद्री सर यांच्या हस्ते संपन्न झाले, तसेच सरस्वती फोटो पूजन चेअरमन लक्ष्मण मंडोळकर व व्हा. चेअरमन संदीप कदम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta