Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने हेस्कॉमचे कर्मचारी यल्लाप्पा गौंडाडकर यांचा सत्कार

Spread the love

 

येळ्ळूर : नोकरीला नोकरी न मानता ती एक सामाजिक बांधिलकी आहे, असे मानत सतत कामामध्ये कार्यरत असणारे येळ्ळूर येथील हेस्कॉमचे निवृत्त कर्मचारी यल्लाप्पा गुंडू गौंडाडकर यांचा येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रस्ताविक प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. व सत्कार नियोजनाचा उद्देश सांगितला. आजच्या घडीला वीज एक अत्यावश्यक सेवा झाली आहे. तिचा लपंडाव हा नेहमीचाच असतो. ग्रामीण भागात तर विजेच्या समस्या कायमच असतात, त्या नियमित करण्याचे काम कर्मचारी यल्लाप्पा गौंडाडकर यांनी केले आहे. कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी येळ्ळूरवासीयांच्या मनात घर केले होते. कशाचीही अपेक्षा न बाळगता व वेळ काळ न पाहता सर्वसामान्य माणसांच्या समस्या तातडीने ते सोडवत असत. पाऊस ऊन वारा याची तमा न बाळगता, शेतशिवारात चालत जाऊन ते विजेची समस्या सोडत असत. आज जरी ते निवृत्त झाले असले तरी निवृत्तीनंतरही त्यांची उणीव येळ्ळूरकराना भासत आहे, असे गौरवोद्गार माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश देसुरकर, डॉ. तानाजी पावले, प्रा. सी. एम. गोरल, बी. एन. मजूकर, सुरज गोरल, यांनी व्यक्त केले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य चांगाप्पा परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, यल्लूप्पा पाटील, नंदकुमार पाटील, चंद्रकांत दऱ्यान्नावर, चांगाप्पा मजूकर, दीपक हट्टीकर, महादेव घाडी, गणपती हट्टीकर, सतीश पाटील, केशव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *