Thursday , April 23 2026
Breaking News

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Spread the love

 

सभासदांना 15% लाभांश जाहीर

बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी नियमित, मण्णूर या संस्थेची 7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक एल. के. कालकुंद्री सर यांच्या हस्ते संपन्न झाले, तसेच सरस्वती फोटो पूजन चेअरमन लक्ष्मण मंडोळकर व व्हा. चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते झाले, तसेच दिपप्रज्वलन प्रकाश बेळगुंदकर व सी. डी. कुलकर्णी तसेच ऍड. महेश जगताप व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांनी केले व अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले, त्याचबरोबर संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्थापक एल. के. कालकुंद्री यांनी सहकारातील महत्व पटवून दिले, त्या नंतर प्रकाश बेळगुंदकर यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले, तसेच कायदा सल्लागार महेश जगताप यांनी सहकारी कायद्याबद्दल माहिती दिली, या नंतर विशेष सल्लागार सी. डी. कुलकर्णी व संचालक संतोष केंचन्नावर व सभासद टी. के. मंडोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेने 2023-24 या आर्थिक वर्षात 13.79 कोटीची उलाढाल केली आहे, तसेच 6,07,766.99 इतका निव्वळ नफा झाला आहे,तसेच सभासदांना 15% लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संस्थेने दाखविलेला विश्वास, प्रामाणिकपणा व तत्पर सेवा पाहून नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या आहेत. अल्पावधीतच ही संस्था प्रगतीपथावर पोहोचली आहे. संस्थेने योग्य नागरिकांना कर्जाचे वाटप केले आहे. तसेच जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या सभेला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, सी. डी. कुलकर्णी, शीतल चौगुले, लता कडोलकर, तसेच संस्थेचे कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर तसेच अ वर्ग सभासद आदी उपस्थित होते. व्यवस्थापक महेश काकतकर यांनी सूत्रसंचालन केले व नारायण शहापुरकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *