बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. पावसामुळे चित्ररथ मिरवणूक उशिरा सुरु झाली. तरी पहाटेपर्यंत शिवभक्तांचा उत्साह कायम होता. नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ योजनांबाबत मंगळवारी मार्गदर्शन
खानापूर : सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवार (ता. १४) रोजी खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमाभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. …
Read More »कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे १६-१६ षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर आयपीएल २०२४ मधील हंगामात बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ ठरला आहे आहे. या अगोदर दोन वर्ष प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळलेल्या या संघाने यंदाच्या हंगामात गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली शानदार पुनरागमन केले. …
Read More »भीषण रस्ता अपघात; अथणी येथील तीन महिलांचा मृत्यू
अथणी : महाराष्ट्रातील सांगोला-जत मार्गावर क्रुझर उलटून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावातील महिला मजुरी काम करण्यासाठी सांगोला येथे जात असताना हा अपघात झाला. बळ्ळीगेरी गावातील महादेवी चौगला, गीता दोडमणी, मलबाद गावातील कस्तुरी या दुर्दैवी महिला मृत्युमुखी पडल्या तर अन्य दोघांची …
Read More »बिजगर्णी हायस्कूलमध्ये गणवेश व शालोपयोगी साहित्य वाटप
बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे बिजगर्णी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालोपयोगी साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे हे उपस्थित होते. प्रारंभी इशस्तवन स्वागत गीत सादर केले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. दरवर्षी …
Read More »अश्लील व्हिडिओ प्रकरणात सीबीआय चौकशीची गरजच काय?
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; एसआयटी चौकशीवर विश्वास बंगळूर : राज्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आमचे पोलिस करतात. एसआयटी म्हणजे आमच्या पोलिसांकडून तपास, माझा आमच्या पोलिसांवर विश्वास आहे, आम्ही कायद्यानुसार एसआयटी स्थापन केली आहे, ते प्रज्वल रेवण्णाविरुद्धच्या लैंगिक घोटाळ्याच्या प्रकरणात निष्पक्षपातीपणे चौकशी करतील आणि अहवाल देतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. …
Read More »प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल बाहेर काढणाऱ्या भाजपा नेत्याविरोधातही लैंगिकछळाची तक्रार, पोलिसांनी घेतले ताब्यात
बेंगळुरू : जनता दल सेक्युलरने (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करणारे भाजपा नेते जी देवराजे गौडा यांना शुक्रवारी उशिरा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. ते बेंगळुरूहून चित्रदुर्गाकडे जात होते, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितले. एका ३६ वर्षीय महिलेने देवराजेविरोधात लैंगिक …
Read More »लग्न रद्द झाल्याच्या रागातून अल्पवयीन विद्यार्थीनीची हत्या
आरोपीही आढळला मृतावस्थेत; कोडगू जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना बंगळूर : कमी वयाच्या कारणावरून निश्चित झालेला विवाह रद्द झाल्याच्या रागात दहावीच्या विद्यार्थिनीचे डोके छाटून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना कोडगू जिल्ह्यातील सोमवारपेठ तालुक्यातील सुरलब्बी येथे घडली. आरोपी प्रकाश ओंकारप्पा (वय ३५) याचा शोध घेणाऱ्या पोलिसांना तोही लटकलेल्या अवस्थेत सापडला. कोडगू जिल्ह्यातील …
Read More »गिल-सुदर्शनच्या शतकांसह गुजरातचा चेन्नईवर विजय
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३५ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरातने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचवेळी चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनली आहे. गुजरातच्या या विजयाने आरसीबीला प्लेऑफमध्येही जिवंत ठेवले आहे. प्रथम खेळताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ३ बाद २३१ धावा केल्या …
Read More »शिवजयंती निमित्त चित्ररथ देखावा मिरवणुकीस उद्या ६ वाजता नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात
बेळगाव : शनिवार दि. ११ मे रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखी पूजनाने श्रीफळ वाढवून सुरु करण्यात येणार आहे. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta