Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाचा शेतकऱ्यांना धक्का

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी (दि. ३) फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला असून, या निकालाविरोधात महिनाभरात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे. हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय …

Read More »

भाजप शिस्तपालन समितीचे यत्नाळाना चर्चेचे निमंत्रण

  दोन्ही गटांच्या दिल्ली, बंगळुरात बैठका; तरुण चुघ सदस्यत्व अभियानासाठी बंगळूरात बंगळूर : भाजप केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी विजापुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना उद्या (ता. ४) भेटण्यासाठी बोलावले आहे, असे पक्षाचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत बोलताना सांगितले. आज दिवसभर बंगळूर व नवीदिल्लीत …

Read More »

फसवणूक झालेल्या महिलांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे मागितली दाद

  बेळगाव : बेळगावमध्ये संघाच्या कर्जाच्या जाळ्यात सापडून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील महिलांनी आज मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. संघातून कर्ज मिळवून देण्यासाठी कमिशनची मागणी करत हजारो महिलांची आर्थिक फसवणूक करत एका महिलेने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक महिलांच्या नवे सदर महिलेने …

Read More »

काँग्रेस अधिवेशन शतकपूर्ती: बेळगावात भव्य सोहळ्याची तयारी

  बेंगळुरू : 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे आयोजित बैठकीत या सोहळ्याच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. 1924 मध्ये बेळगाव येथे पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर येथे विशेष बैठक झाली. …

Read More »

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी ४४ कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीची घोषणा केली. अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित ‘वर्ल्ड डिसेबिलिटी डे’ कार्यक्रमात त्यांनी सदर घोषणा केली आहे. आज श्री कंठीरव सभांगणात आयोजित ‘वर्ल्ड डिसेबिलिटी डे’ कार्यक्रमात त्यांनी हि घोषणा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

महामेळाव्यास खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवस्मारक भवन येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई हे होते. यावेळी कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे दिनांक …

Read More »

कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या “समीक्षा” ग्रंथास पुरस्कार जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-वारणानगर च्या वतीने “स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार” प्रसिद्ध कवी डॉ. चंद्रकांत पोतदार (मराठी विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी तालुका चंदगड) यांच्या “परिघाच्या रेषेवर “या समीक्षाग्रंथास जाहीर झाला. दि. 7 व 8 डिसेंबर रोजी शाखेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलनाचे विनय कोरे क्रीडा …

Read More »

राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्काराचा उद्या वितरण समारंभ

  बेळगाव ‌: थोर समाजसुधारक राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी राहणार असून त्यांच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पंचवीस …

Read More »

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकीरण समितीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास परवानगी द्यावी अन्यथा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करुन कर्नाटकातील वाहनांना अडवण्याचा इशारा दिला. याबाबचे निवेदन …

Read More »

सन्मित्रच्या खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी नवहिंद क्रिडा केंद्र मैदान येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील मुलांच्या गटाचे विजेतेपद बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघाने व उपविजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने तर तृतीय क्रमांक तोपिनकट्टी संघाने मिळविला, …

Read More »