बेळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे तर समाजावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी व्यावसायिक उत्कृष्टता सेवा पुरस्कारांचे आयोजन केले. या समारंभात प्रामाणिकपणा, समर्पण आणि सेवेच्या भावनेने इतरांना उंचावण्यासाठी आपल्या कौशल्यांचा वापर करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षीचे पुरस्कार विजेते असे श्रीमती …
Read More »संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून; पाटील मळा येथील घटना
बेळगाव : संपत्तीच्या वादातून वारंवार होत असलेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन पुतण्याने स्वतःच्या काकाचा जांबीयाने भोसकून खून केल्याची घटना शहरातील पाटील मळ्यात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ माजली आहे. अनिल शरद धामणेकर (वय 46) रा. पाटील मळा बेळगाव असे ठार झालेल्या मयताचे नाव आहे. मिळालेली अधिक माहिती …
Read More »वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट
कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी, याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. आज याच संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते. गडावरील हा कथित कुत्रा …
Read More »खानापूर येथील एका हॉटेल आवारातील कुत्र्याच्या हल्ल्यात एक जखमी
खानापूर : खानापूर शहरातील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये शहापूर येथील विनायक मेलगे (वय वर्षे 40) हे जेवणासाठी गेले होते. त्यांच्यावर त्याच हॉटेलच्या आवारात बसलेल्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना 23 मार्च रोजी रात्री खानापूर -गोवा मार्गावरील एका नामांकित हॉटेल आवारात घडली आहे. सदर घटनेनंतर जखमी विनायक यांना त्याच्याच नातेवाईकांनी …
Read More »समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना जामीन मंजूर
बेळगाव : कन्नडधार्जिण्या पोडिओशी मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरलेल्या किणये येथील तरुणाचा सत्कार केल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कानडी संघटनांच्या दबावामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. आज शुभम शेळके यांना जामीन मंजूर झाला. त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका झाली. यावेळी नगरसेवक …
Read More »हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबीर दि. 1 एप्रिल ते 31 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व सायंकाळी 4.30 ते 6.30 नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (लेले ग्राउंड) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, …
Read More »आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी
बेळगाव : भाजपची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने तसा आदेश जारी केला आहे. सातत्याने वादग्रस्त विधाने करून बसनगौडा यांनी पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. पक्षाच्या केंद्रीय …
Read More »जिल्हा – तालुका पंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू
बेळगाव : राज्यात जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू असून लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे असे आज बेळगाव दौऱ्यावर आलेले राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी सांगितले. या वेळचे तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र …
Read More »अंबिलगाडा मिरवणुकीवेळी जखमी झालेल्या ‘त्या‘ तरुणाचा मृत्यू
बेळगाव : बसवन कुडची येथे सुरू असलेल्या यात्रेनिमित्त अंबिलगाडा मिरवणुकीवेळी गाडीच्या चाकाखाली सापडून गंभीर युवक गंभीर झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पारीश पाटील (वय 27, राहणार बसवन कुडची) असे त्या तरुणाचे नाव आहे. बेळगाव शहारापासून जवळच असलेल्या बसवन कुडची यात्रेनिमित्त काढल्या गेलेल्या आंबिलगाडा मिरवणुकीवेळी पारीश पाटील गाडीच्या चाकाखाली …
Read More »उर्मिला शहा यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे ‘माझं घायाळ आभाळ’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव : हरवत चाललेला आपलेपणा, नात्यातली संपत चाललेली ओल वगैरे हक्काच्या आकाशात अन अवकाशात जपता आलं पाहिजे असं सांगणाऱ्या भावगर्भ कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. येथील शब्दगंध कवी मंडळ संघाच्या वतीने सोमवार दि. २४ मार्च रोजी जागतिक कविता दिनानिमित्त कवयित्री उर्मिला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta