बेळगाव : मंगळवारी संध्याकाळपासून बेळगाव शहरात पावसाच्या सरी बरसल्या. काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना वळीवाच्या पावसाने गारवा अनुभवायला मिळाला. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरात वारा वाहू लागला आणि संध्याकाळनंतर पावसाच्या हलक्या सरींनी सुरवात झाली. वाढती उष्णता आणि तीव्र पाणी टंचाई पाहता बेळगावकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला …
Read More »न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
बेळगाव : न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी हा परिसर सध्या कचऱ्याचा अड्डा बनला आहे. या भागात असलेल्या खुल्या जागेत स्थानिक रहिवाशी व दुचाकीस्वार कचरा टाकतात त्यामुळे न्यू शिवाजी कॉलनी येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. सदर ठिकाणी कचरा, शिळे अन्नपदार्थ, प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचरा रस्त्यावर फेकला गेल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली …
Read More »इंद्रप्रस्थ नगर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
बेळगाव : इंद्रप्रस्थ नगर येथील एका अपार्टमेंट परिसरात सकाळी ५:३० वाजता भटक्या कुत्र्यांनी दोन सिक्युरिटी गार्ड्सवर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात नारायण पार्सेकर रा. आनंदनगर वडगाव, तसेच तुरब देसाई रा. आंबेडकर नगर, अनगोळ येथील दोघांच्या पायांवर चावल्याने जखमेतून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध अवस्थेत पडले. घटनेनंतर जखमींना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात …
Read More »कोरटकरला तीन दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर येताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. कोल्हापूर कोर्टात …
Read More »वैजनाथ मंदिराचे पुजारी प्रमोद बर्वे यांची आत्महत्या
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड महाराष्ट्र) जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान …
Read More »संविधान बदलण्याच्या वक्तव्यावरून भाजपची शिवकुमारांवर टीका
वक्तव्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण; भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी राज्यातील मुस्लिमांसाठी चार टक्के आरक्षणात सामावून घेण्यासाठी संविधानात बदल करणार असल्याचे वक्तव्य केल्याचा आरोप करून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परंतु आपण अशी कोणतीही टिप्पणी केली …
Read More »कर्नाटक ‘हनी-ट्रॅप’ वाद : जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी
प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी बंगळूर : कर्नाटक सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांना आणि न्यायाधीशांसह अनेकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याच्या कथित घटनेची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, याचिकाकर्ता बिनय कुमार सिंग यांच्या …
Read More »प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या; प्रेमीयुगुल अटकेत
कित्तूर : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना कित्तूर येथील अंबडगट्टी गावात घडली असून प्रेमीयुगुलाला अटक करण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, महाबळेश कामोजी आणि सिमरन या प्रेमीयुगुलांचे मागील ५ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्याही कुटुंबाला त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती नव्हती. सिमरन – महाबळेश …
Read More »समिती युवा नेते शुभम शेळके यांना अटक..
बेळगाव : कन्नडधार्जिण्या पीडीओला जाब विचारणाऱ्या किणयेतील (ता. बेळगाव) मराठी तरुणाचा सत्कार केला व सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या प्रकरणी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवुन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके …
Read More »धर्मवीर संभाजीनगर वडगांव नागरिकांतर्फे महापौर मंगेश पवार यांचा सत्कार
बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील श्री गणेश मंदिर ट्रस्ट, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि महिला मंडळ यांच्यावतीने बेळगांवचे नवनिर्वाचित महापौर श्री. मंगेश नारायण पवार तसेच वार्ड क्र. 50 च्या नगरसेविका सौ. सारिका पाटील यांचा श्री गणेश मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta