बेळगाव : कँटोन्मेंट बोर्डाच्या एकूण १७६३.७८ एकर क्षेत्राचे तसेच विविध बाबींचा समावेशासह संपूर्ण सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. आज मंगळवारी (१६ जुलै) संरक्षण मंत्रालयाच्या सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते होते. बेळगाव कँटोन्मेंट …
Read More »शांताई वृद्धाश्रम व उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण
बेळगाव : बेळगावच्या शांताई वृद्धाश्रम आणि उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण करण्यात आले. भरतेश वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून डेंग्यू जनजागृती व लसीकरण करण्यात आले. शांताई वृद्धाश्रमातील सदस्य व कर्मचाऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वाटप केले. तसेच उषाताई गोगटे शाळेत आयोजित डेंग्यू लसीकरण शिबिराचा सुमारे …
Read More »श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथे नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न
शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच परशराम निंगाप्पा पाटील होते. नूतन इमारत लोकार्पणाचा उदघाटक रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते पूजन व फित कापून करण्यात आले. कोनशिला उद्घाटन दिपकराव भरमूआण्णा पाटील, मायाप्पा …
Read More »वीज बिल माफ करण्यासाठी विणकरांचे धरणे आंदोलन
बेळगाव : पावसाळी अधिवेशनात यंत्रमागधारक विणकरणाचे वीजबिल माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील विणकरांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला. निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेल्या यंत्रमागधारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही, अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणाऱ्या यंत्रमाग विणकरांचे जगणे …
Read More »उत्तर कन्नडमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळून 7 जणांचा मृत्यू
अंकोला : उत्तर कन्नड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक भीषण दुर्घटना घडली असून डोंगर कोसळून ७ मजूर चिखलात अडकल्याची घटना शिरूरजवळ घडली आहे. अंकोला तालुक्यातील शिरूरजवळील राष्ट्रीय महामार्गालगत ही दुर्घटना घडली असून अजूनही अनेक लोक चिखलाखाली अडकल्याचा संशय आहे. अपघातावेळी कामात गुंतलेले लॉरी आणि टँकर नदीत वाहून गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग …
Read More »अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; लोंढा परिसरातील घटना
लोंढा : शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर तीन अस्वलानी पाठीमागून हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याने धाडसाने दगड मारून अस्वलाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. लोंढा येथे सदर घटना घडली. दगडाने मारल्यामुळे तीन अस्वले शेतकऱ्याला सोडून पळून गेली. सकाळी नेहमी प्रमाणे प्रभू शिनुटगेकर हे आपल्या शेताकडे निघाले …
Read More »कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची बेळगाव येथे भेट घेतली. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबतचे निवेदन सादर केले. राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कर्नाटक राज्य रयत …
Read More »मागासवर्गीय समाजातील युवकांनी उद्योजक व्हावे
पालकमंत्री सतीश जारकीहोळी; बोरगाव ओमगणेश टेक्स्टाईलला भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारकडून मागासवर्गीय समाजासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. अल्प व्याजदरात व मोठ्या प्रमाणात सबसिडी देऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याचा दलित व मागासवर्गीय समाजातील युवकांनी लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी …
Read More »गर्भलिंग तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलवर धाड
बेळगाव : पीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी करणाऱ्या मूडलगी येथील हॉस्पिटलवर राज्य आरोग्य विभाग प्राधिकरण आणि राज्य तपासणी आणि देखरेख समितीने छापा टाकला. मूडलगी येथील इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. कुतेझुल्ला कुब्रा हे गर्भ लिंग तपासणी करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तसेच …
Read More »सीमाप्रश्नी संसदेत आवाज उठवावा; खासदार शाहू महाराज यांना निपाणी विभाग समितीच्यावतीने विनंती
निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे नु पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली. श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, त्यानंतर सीमाप्रश्नी आपण संसदेत मुद्दा उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून सीमाभागाधील 865 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta