Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

म. ए. समिती नेत्यांना दिलेल्या पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला स्थगिती

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना दिनांक 3/4/ 2024 रोजी मार्केट पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार समितीच्या 11 जणांना पोलीस उपायुक्तांनी नोटीस बजावून प्रत्येकी 50 हजार रुपयाचा वैयक्तिक बॉण्ड व प्रत्येकी दोन जामीनदार देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला या सर्वांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सदरची याचिका नववे अतिरिक्त …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी स्वीकारला काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म

  खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मंत्री श्री. मानकालू वैद्य आणि कित्तुरचे आमदार श्री.बाबासाहेब पाटील तसेच शिरसीचे आमदार श्री. बिम्मण्णा नायक …

Read More »

आदित्य मिल्कचे शिवकांत शिदनाळ यांचे निधन

  बेळगाव : आदित्य मिल्क ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या विजयकांत डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शिवकांत सिदनाळ (वय ५९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बेळगावचे माजी खासदार स्व. एस. बी. सिदनाळ यांचे पुत्र तसेच व्हीआरएल लॉजिस्टिकचे मालक विजय संकेश्वर यांचे ते जावई होत.

Read More »

काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर १६ एप्रिलला अर्ज दाखल करणार

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कारवार येथे दाखल करणार आहेत. कारवार लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १६ तारखेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज (नॉमिनेशन) कारवार येथे भरणार आहेत. यावेळी कारवार जिल्ह्यातील …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक रविवारी

  पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अधिपत्याखाली एकशे पाच वर्षाची परंपरा लाभलेला बेळगाव येथील वैभवशाली शिवजयंती उत्सव ९ मे २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या उत्सवाबद्दल विचार विनिमय करून पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगाव शहर …

Read More »

हिंडलगा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

  बेळगाव : बेळगाव -वेंगुर्ला महामार्गावर विनायकनगर परिसरात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावरून वाहने वेगाने ये-जा करीत असतात. येथील हिंडलगा गणपती ते हिंडलगा मराठी हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका संभवतो. बेळगाव -वेंगुर्ला महामार्गावरून प्रामुख्याने सावंतवाडी, चंदगड भागातील वाहनांसह बेळगाव ग्रामीण भागातील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. …

Read More »

कर्नाटकात उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू; उष्माघाताच्या ५२१ रुग्णांची नोंद

  बंगळूर : कर्नाटकातील अनेक भागात तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. रखरखत्या उन्हाने जनता हैराण झाली असून तापमानात वाढ झाल्याने नागरिक चिंतेत आहेत. सूर्यप्रकाशामुळे उष्माघाताची ५२१ प्रकरणे अधिकाऱ्यांनी नोंदवली आहेत. राज्यात मार्चपासून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत बागलकोट आणि गुलबर्गा जिल्ह्यात प्रत्येकी एक …

Read More »

खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश

  बंगळूर : अभिनेत्री आणि मंड्यातील अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी शुक्रवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटक निवडणूक प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा …

Read More »

हैदराबादचा चेन्नईवर ६ विकेट्सने विजय

  हैदराबाद : नितीश रेड्डीचा विजयी षटकार आणि हैदराबादच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला. हैदराबादने ११ चेंडू आणि ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरूवात करून दिली. संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी खूप धावा …

Read More »

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक

  बंगळुरू : बंगळूरु येथील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या केसमध्ये पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून त्यांचं दोन संशयितांसोबत कनेक्शन असल्याचं बोललं जातंय. एनआयएने भाजप कार्यकर्ता साई प्रसाद याला ताब्यात घेतलं आहे. साई प्रसादची चौकशी सुरु आहे. मागच्या आठवड्यात …

Read More »