Monday , September 21 2026
Breaking News

गोकाक येथे 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू : पालकांचा डॉक्टरांविरोधात संताप

Spread the love

 

गोकाक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयातील उपकरणे फोडल्याची घटना गोकाक येथील ब्याळीकाटाजवळील कडाडी रुग्णालयात घडली.
डॉ. महांतेश कडाडी यांचे खाजगी रुग्णालय असून, शिवानंद निंगाप्पा बडबडी यांच्या 7 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला, संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील साहित्याची नासधूस केली. आजारी असल्याने चार दिवसांपूर्वी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरा बालकाची प्रकृती गंभीर बनली. डॉक्टरांनी आज सकाळी रुग्णवाहिका आणा आणि मुलाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार मुलाच्या पालकांनी रुग्णवाहिकाही आणली. मात्र, रुग्णवाहिका येईपर्यंत मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जेव्हा डॉक्टरांकडून मूल मृत झाल्याचे सांगण्यात आले त्यावेळी पालक आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरांवर संतप्त झाले आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून डॉक्टरांविरुद्ध संताप व्यक्त केला. घटनास्थळी भेट देणाऱ्या गोकाक पोलिसांना तातडीने परिस्थितीची माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संतप्त लोकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *