बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मन्नूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मन्नूर गावातील मराठी प्राथमिक शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल. के. कालकुंद्री सर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती फोटोचे पूजन सर्व …
Read More »केंद्राच्या तीन नव्या कायद्यांना कर्नाटक सरकारचा विरोध; कायद्यांत दुरुस्तीचा विचार
बंगळूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कायद्यांना राज्य सरकारने विरोध केला आहे. केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यात सुधारणा करून नवीन कायदे लागू केले आहेत. कोणतेही सरकार कायदा करते, त्यांना त्यांच्या कार्यकाळात त्याची अंमलबजावणी करण्याचा नैतिक अधिकार आहे. मात्र, सरकारचा …
Read More »चंदगड तालुका रहिवाशी संघटनेचे आवाहन
बेळगाव : येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना बेळगाव. आणि चंदगड मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करत आहोत. सदर कार्यक्रम संस्था व संघटनेच्या सभासदांच्या मुलांसाठी असून पहिली ते पाचवी पर्यंतच्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची वितरण तसेच दहावी व बारावीच्या 70 टक्के …
Read More »‘स्थानिक स्वराज’च्या निवडणुका जिंकण्याचाचा निर्धार; केपीसीसी बैठकीत सविस्तर चर्चा
बंगळूर : प्रदेश कॉंग्रेस समिती (केपीसीसी) पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. १) येथील केपीसीसी कार्यालयात पार पडली. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी करून पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी बीबीएमपी, जिल्हा पंचायत, तालुका …
Read More »दूध दरवाढ कमी न केल्यास बेळगावात भाजपकडून तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : दुधाला 5 ते 10 रुपयांचे अनुदान वाढवावे आणि दुधाच्या दरात कपात करावी या मागणीसाठी बेळगावात भाजपतर्फे राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. भाजपचे शहराध्यक्ष सुभाष पाटील यांनी, प्रोत्साहन …
Read More »येळ्ळूर – वडगाव रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात पालकमंत्र्यांना येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव : येळ्ळूर ते वडगावपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्यावतीने उपाध्यक्ष आणि सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना …
Read More »“बेलगाम कॅन्टोन्मेंट बोर्ड”चे नामकरण “बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड” करण्याचा घाट
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या वतीने आक्षेप बेळगाव : बेलगाम कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामकरण बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या नोटीसनुसार आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नामांतराला कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ श्री. राजीव कुमार यांच्या नावे पत्र देवून सदर आक्षेप नोंदविण्यात आला. स्वातंत्र्य पूर्व काळापासून “मराठा लाईट इन्फंट्री …
Read More »रुग्णांच्या आयुष्यातील दुसरा देव म्हणजेच डॉक्टर : रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्स दिनी मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान बेळगाव : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजारपणात औषधोपचाराची गरज असते त्यावेळी त्यांना देवरूपी डॉक्टर ती गरज पूर्ण करत असतात, म्हणूनच त्यांना रुग्णांच्या आयुष्यातील दुसरा देव म्हणायला हरकत नाही. अनेकजण वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणावाखाली वावरताना दिसत आहेत अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांसमोर मोठी जबाबदारी …
Read More »पीओपी गणेश मूर्तींवर बंदी नको; गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने प्रशासनाला निवेदन
बेळगाव : दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मूर्तीकारांसाठी विशेष पुढाकार घेतला आहे. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री सतीश जारकीहोळी तसेच बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे या विविध अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात आपले म्हणणे …
Read More »निपाणी तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदी अजित पाटील
कार्याध्यक्षपदी बंडा पाटील ; निपाणीतील राजवाड्यात निवडी निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रीमंत विजयराजे देसाई सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी तालुका म. ए. समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. भारत पाटील होते. महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्षपदी अजित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta