Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव लोकसभेसाठी समिती देणार उमेदवार! ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेला एक उमेदवार देण्यावर ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२४ पर्यंत रोज दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत रंगुबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येतील ही …

Read More »

बेळगावात जेएमएफसी न्यायालयासमोर करणीबाधा

  बेळगाव : चक्क न्यायदेवतेच्या मंदिरासमोरच अंधश्रद्धेतून करणीबाधेचे साहित्य ठेवल्याचा खळबळजनक प्रकार आज बेळगावात उघडकीस आला. बेळगावातील चन्नम्मा चौकाजवळील नव्या जेएमएफसी न्यायालय कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुलालाने माखलेला नारळ, लाल-काळे पाणी भरलेले प्लास्टिक ग्लास, तांदूळ, काळ्या बाहुल्या, लिंबू असे चित्रविचित्र साहित्य एका पत्रावळीत भरून अज्ञातांनी ठेवून दिल्याचे आज सकाळी उघडकीस आले. …

Read More »

ज्ञानवापी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मशिदीच्या पक्षकारांना झटका

  वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा झटका बसला आहे. व्यासांच्या तळघरात पूजा सुरु राहील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तळघरात पूजा सुरु ठेवण्याच्या वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीसही पाठवली आहे. कोर्टाने सद्य स्थितीबाबत आदेश देताना मशिदीची गुगल अर्थ …

Read More »

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

  नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊज ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. ईडीने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला. त्यामुळे आता 15 एप्रिलपर्यंत ते तिहार जेलमध्ये असतील. कोर्टासमोर हजर …

Read More »

भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल

  विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर! नवी दिल्ली : भाजपचे अध्वर्यू, माजी उपपंतप्रधान आणि राम मंदिर आंदोलनाच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय षटकार लगावला होता. त्यानंतर आज मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना …

Read More »

कावळेवाडीतील पारायण सोहळ्याची सांगता

  बेळगाव : कावळेवाडीतील (ता. बेळगाव) वारकरी मंडळातर्फे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिभावाने सांगता झाली. यानिमित्त रोज काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, महिला भजन, नामजप, कीर्तन निरुपण आदी कार्यक्रम झाले. अधिष्ठान मारुती पाटील यांचे होते. पहिल्या दिवशी दिंडी, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन निरूपण, जागर भजन असे कार्यक्रम झाले. पारायण सोहळ्यात …

Read More »

दिल्लीचा चेन्नई सुपर किंग्सवर 20 धावांनी विजय

  सलग दोन पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्या सामन्यात विजयाचा नारळ फोडला आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्सला हे आव्हान पेलता आलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी गमवून …

Read More »

लोकसभा उमेदवार निवडीसंदर्भात समितीच्या 32 जणांची कमिटी जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभा उमेदवार निवडीसंदर्भात 32 जणांची कमिटी जाहीर करण्यात आली आहे. बेळगांव दक्षिण मधील 11, उत्तर मधील 11 आणि ग्रामीण मधील 10 अशा एकूण समितीच्या 32 कार्यकर्त्यांची निवड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. सदर कमिटी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. या संदर्भात विचारविनिमय …

Read More »

रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी घेतली मनोज जरांगे -पाटील यांची भेट

  मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत होणाऱ्या अन्यायासह मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि देशातील शेतकऱ्यांच्यावर होत असलला दूर करण्यासाठी …

Read More »

रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने डोकं फोडलं, क्रिकेट प्रेमीचा उपचारादरम्यान मृत्यू

  कोल्हापूर : आयपीएल स्पर्धा सध्या जोशात सुरु आहे. अशात कोल्हापुरात अत्यंत क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमी माणसाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना होता. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद झाला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा सीएसकेचा फॅन असलेल्या एका क्रिकेटप्रेमी रसिकाने केली. त्यानंतर त्यांचं …

Read More »