Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

गांजाची अवैध विक्री; आरोपीला अटक

  बेळगाव : बेळगावच्या गणाचारी गल्लीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. आकाश सुनील परीट असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणाचारी गल्लीत गांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान 176 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि 14,200 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार खलबतं, महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजच सुटणार?

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या प्रचंड खलबतं सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …

Read More »

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत ३१ मार्च रोजी महारॅलीचंं आयोजन!

  नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या निषेधार्थ इंडिया आघाडीने एकजूट दाखवली असून देशभर निदर्शने केली जात आहेत. तसंच, आता ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आता महारॅलीही काढण्यात येणार आहे. इंडिया …

Read More »

खानापूर म. ए. समितीची मंगळवारी बैठक

  खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी दु. 2 वाजता कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक समितीप्रेमी नागरिकांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित …

Read More »

दहावी परीक्षेस उद्यापासून प्रारंभ

  बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची मानल्या दहावीच्या परीक्षेला सोमवार (ता. २५) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली असून रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक घालण्याचे काम पूर्ण केले जाणार असून रंगपंचमी दिवशी दहावीचा पहिला पेपर पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर …

Read More »

समिती विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार; रणजित चव्हाण -पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड

  बेळगाव : शहर समितीच्या विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार असून नवीन युवा कार्यकर्ते लढ्यासोबत जोडले जात आहेत. त्यामुळे समितीला बळकटी प्राप्त होत आहे, असे विचार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीची बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. महादेव पाटील यांनी प्रास्तविकात, सीमालढ्यात …

Read More »

लोकसभेला मराठा व्होट बँकची ताकद दाखवणार : मनोज जरांगे-पाटील

  अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर आज मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे. “बैठकीला उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाने आपआपल्या गावात …

Read More »

भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून दोघा जणांचा मृत्यू

  बेळगाव : भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून मोटारसायकलवरून खाली पडल्याने दोघा जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री पहिल्या रेल्वेगेटजवळ ही घटना घडली असून शनिवारी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. ऍड. अभिषेक मुत्ताप्पा कित्तूर (वय ३२) रा. राणी चन्नम्मानगर व किरण रमेश अळगुंडी (वय २३) रा. गोकाक …

Read More »

होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर-तालुक्यात दोन दिवस दारूबंदी

  बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर व उपनगरात रविवार दि. २४ मार्चच्या दुपारी २ पासून सोमवारी २५ मार्चच्या मध्यरात्री ११.५९ पर्यंत वाईन शॉप, …

Read More »

एनडीआरएफ अनुदानासाठी कर्नाटकाची सर्वोच्च न्यायालयात दाद

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; पाच महिन्याच्या प्रतिक्षेनंतर निर्णय बंगळूर : राज्याला केंद्रीय आपत्ती निवारण (एनडीआरएफ) निधी तातडीने देण्याचे केंद्राला निर्देश द्यावेत, अशी मागणी करत आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ते आज देतील, उद्या देतील, आज येतील, उद्या येतील, अशी पाच महिने वाट पाहिली. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »