Saturday , June 6 2026
Breaking News

बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बसविण्याचे निर्देश द्यावेत

Spread the love

 

माजी आमदार अनिल बेनके यांनी घेतली रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट

बंगळुरू : बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा बसविण्यासाठी भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली.
या संदर्भात बोलताना अनिल बेनके म्हणाले की, बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती श्री शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसविण्याची मागणी सातत्याने होत आहे. बेळगांव हे पारंपारिक शहर मानले जात असल्याने जिल्ह्यात मोठ्या संख्येने शिवभक्त आहेत आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याशी भावनिक ओढ आहे. तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगांवला भेट दिली होती. मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंटल सेंटर कॅन्टोन्मेंट कॅम्प परिसरात आहे. तसेच बेळगांवचे रेल्वे स्थानक देखील कॅन्टोन्मेंट कॅम्प परिसरात आहे. दोन्ही प्रतिमा बसविण्यासाठी विविध संघटना सातत्याने आंदोलने करत आहेत. दोन्ही प्रतिमा रेल्वे स्थानकाच्या भंडारगृहात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा आणि बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तातडीने बसविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी माजी आमदार अनिल बेनके यांनी रेल्वे राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांना केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love  विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *