Saturday , November 7 2026
Breaking News

चिक्कोडीत भाजपचा पराभव नाही; अहंकारी अण्णासाहेब जोल्ले हरले : प्रमोद मुतालिक

Spread the love

 

बेळगाव : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मोदी किंवा हिंदूंचा पराभव झाला नाही. अण्णासाहेब जोल्ले अहंकारी होते आणि कार्यकर्त्यांना सहकार्य न केल्याने त्यांचा पराभव झाल्याचे श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सांगितले.
ते आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मोदी किंवा हिंदूंचा पराभव झाला नाही. केवळ वैयक्तिक विकास करणारे अण्णासाहेब जोल्ले यांनी कार्यकर्त्यांच्या कष्टाला, आनंदाला प्रतिसाद दिला नाही. चिक्कोडीत भाजप अजूनही जिवंत आहे. पुढच्या वेळी बरोबर उत्तर देईन.
दर्शन हा अभिनेता असूनही त्याने जे केले ते अक्षम्य आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस विभागाने व न्यायालयाने शिक्षा द्यावी, तरच न्यायाचे मोल कळेल व न्यायालयावर व पोलीस खात्यावर विश्वास निर्माण होईल. दर्शनच्या पत्नीने एकदा रेणुकास्वामींच्या घरी भेट द्यावी . तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाचा विचार करा. कुटुंबीय रडून आक्रोश करीत आहेत. वकिलांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रेणुकास्वामी कुटुंबाला मदत करू द्या. असे ते म्हणाले.

पोलिसांवर राजकारणी दबाव आणत आहेत. पोलिसांना स्वातंत्र्य दिल्यास मंदिराजवळील एक बूटही चोरीला जाणार नाही. पोलिसांनी राजकारण्यांचे गुलाम न होता कायद्याचे गुलाम बनावे असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी श्री राम सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *