Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

आंतरराज्य जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंचे घवघवीत यश

  बेळगाव : फोंडा गोवा येथे नुकत्याच साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील जलतरण तलावात संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूणी घवघवीत यश संपादन करताना द्वितीय क्रमांकासह तीन वैयक्तिक चॅम्पियनशिप तसेच रनर्सअप चॅम्पियनशिप पटकाविली. यांनी या स्पर्धेत एकूण 67 पदके पटकाविली यामध्ये 26 सुवर्ण 20 रौप्य …

Read More »

एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं सूचक विधान

  नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते, असे विधानही त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला. बहुमताचा २७२ हा आकडा त्यांना …

Read More »

खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक संपन्न

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता संघटनेचे अध्यक्ष श्री. बनोसी सर यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली. जनरल सेक्रेटरी श्री. पवार यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. …

Read More »

साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण” या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४ जाहीर

  ठाणे : ठाणे शहरातील नव्या दमाचे व सतत वास्तववादी विषयावर रोखठोक व परखडपणे आपल्या लेखणीतून लेखन करणारे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या ” प्रेयसी एक आठवण..” सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला नामवंत जेष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउदेशीय संस्था महागाव, जि.कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकाच्या उत्कृष्ट साहित्य …

Read More »

राज्यात ४५ हजार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला अनुमती

  प्राथमिक ३५ हजार, माध्यमिक १० हजार शिक्षकांची नियुक्ती बंगळूर : शालेय शिक्षण विभागाने सरकारी प्राथमिक शाळांसाठी ३५ हजार आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी १० हजार अशा एकूण ४५ हजार अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील सुमारे ४९ हजार ६७९ सरकारी शाळांमधील अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी …

Read More »

जागतिक रक्तदान दिनानिमित्त ‘इनरव्हील’तर्फे रॅली

  बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव आणि बेळगाव येथील जैन हेरिटेज स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती. दावणगेरे येथील ब्लडमॅन शिवकुमार म्हादिमाने हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते. धर्मवीर संभाजी चौकातून धर्म. संभाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे किर्लोस्कर रोड, रामदेव …

Read More »

बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा

  बेळगाव : दिनांक 14 जून 2024 रोजी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदतर्फे आज चव्हाट गल्ली येथे बेळगाव कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये बेळगावातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या विशेष सभेमध्ये सहभागी झाले होते. प्रमुख म्हणजे मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, …

Read More »

सीमाभागासाठी राखीव जागेचा निर्णय ऐतिहासिक

  निपाणी विभाग म. ए. युवा समितीची बैठक; मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न निपाणी (वार्ता) : कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना पदवीत्तर शिक्षणामध्ये राखीव जागा व शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. या पुढील काळातही मराठी भाषिकासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या …

Read More »

भुतरामहट्टीजवळ टिप्पर – बसचा अपघात; कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी

  बेळगाव : भुतरामहट्टीजवळ टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 40 विद्यार्थी जखमी झाले असून जखमींवर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर येथील विद्यार्थी धारवाड विद्यापीठाच्या सहलीवर आले होते. त्यावेळी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देऊन …

Read More »

वाघवडे-मच्छे रस्त्याची झालेली दुरावस्था; डागडुजी करण्याची मागणी

  बेळगाव : वाघवडे-मच्छे रस्त्याची झालेली दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकवेळा लहानसहान अपघात घडत आहेत. वेळोवेळी निवेदन देऊन …

Read More »