Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 14 जून 2024 रोजी बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदतर्फे आज चव्हाट गल्ली येथे बेळगाव कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये बेळगावातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या विशेष सभेमध्ये सहभागी झाले होते. प्रमुख म्हणजे मराठा समाजाच्या शिक्षणासाठी, विकासासाठी आणि उन्नतीसाठी सभा घेण्यात आली होती. बेळगावमध्ये सदाशिव नगरमधील 22 गुंठे जमीन माजी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई आणि माजी मुख्यमंत्री श्री. बी.एस. येडीयुराप्पाजी यांनी लीज वर दिली आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल बेनके पुढाकार घेऊन सर्व बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख नेते मंडळी यांचा सल्ला घेऊन मराठा भवन बांधण्याची जबाबदारी घेण्यात आली आणि याच संदर्भात जिल्ह्यातील सर्व कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 26-06-2024 रोजी घेण्याचे ठरले. या प्रकल्पात सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून सहभागाचे आश्वासन दिले आहे. बेळगाव जिल्ह्यात 15 लाख मराठा समाज असून, विखुरलेल्या समाजासाठी करण्याचे काम मोठे आहे. सर्व मराठा समाज बांधवांना एका छताखाली आणून समाजाला बळकटी देण्याचे काम कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेने हाती घेतले आहे.
यावेळी बेळगाव कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या समवेत कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद खानापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, बसवराज म्यॅगोटी, संजीव भोसले, उचगाव विभाग अध्यक्ष डी. बी. पाटील, बेळगाव तालुका कार्यदर्शी एस. व्ही. जाधव, मनोज पाटील, प्रमोद बी. गुंजीकर, बेळगाव तालुका उपाध्यक्ष रोहन कदम, सुरेश पाटील खानापूर, राहुल पवार खानापूर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *