Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

मंगाई नगर येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू

  बेळगाव : मंगाई नगर वडगाव येथे तलावात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. उदय गुरुराज सेठ (39) मुळगाव उत्तर कन्नड जिल्हा सध्या राहणार वडगाव मांगाई नगर असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, उदय हा तलावाकडे …

Read More »

बेळवट्टी माध्यमिक विद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन

  बेळगाव : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील विश्वभारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच संगणक कक्षाचे उदघाटन व ईमारतीच्या नुतनीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. शाळा बांधकाम समिती व विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे संचालक बी. बी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर, माजी …

Read More »

चार्टर्ड अकाउंटंट्सची राष्ट्रीय परिषद 9 आणि 10 जून रोजी

  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेच्या वतीने संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बेळगाव येथील केएलई सेन्टेनरी हॉलमध्ये 9 आणि 10 जून रोजी चार्टर्ड अकाउंटंट्सची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा यांनी दिली. बेळगावातील आयसीएआय हॉलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, इन्स्टिट्यूट …

Read More »

म. ए. समितीच्या लोकप्रतिनिधींमुळेच बेळगावात भाजपचा विजय : महांतेश कवठगीमठ

  बेळगाव : नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्यामुळे जगदीश शेट्टर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले, अशी कबुली माजी आमदार महंतेश कवठगीमठ यांनी दिली. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कवठगीमठ म्हणाले की, निजदचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर व माजी नगरसेवकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळेच भाजपला इतके …

Read More »

जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिन

    बेळगाव : दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन घोषवाक्य ठेवली जातात. 2024 चे घोषवाक्य म्हणजे “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे जेणे करून भावी पिढ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते” या राष्ट्रीय हेतूचा उद्देश साधून जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) व शहापूर येथील गोवावेस स्थित न्यू गर्ल्स हायस्कूलच्या सहकार्यातून …

Read More »

मोदींच्या ३.० कॅबिनेटमधील मंत्र्यांची यादी..

  कर्नाटकातून ६ जणांना संधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही शपथ घेऊ शकतात. सध्या मोदी ३.० च्या मंत्रिमंडळासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे आली आहेत. मोदी सरकार ३.० …

Read More »

नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; निमंत्रण पत्रिका आली समोर

  नवी दिल्ली : नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे. मोदींच्या शपथविधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते …

Read More »

सगेसोयऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन पाडू : मनोज जरांगेंचा थेट इशारा

  जालना : सगेसोयरे अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन आमदारांना पाडू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात ते उपोषणाला बसणार आहे. पोलिसांनी …

Read More »

महांतेश नगर येथील विकासकामाला प्रारंभ

  बेळगाव : महांतेश नगर भागात पावसाळ्यात रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि पिण्याच्या समस्यांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी अलीकडेच सर्वे केला होता. यानंतर या भागातील समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज आमदारांच्या अनुपस्थितीत आमदारांचा मुलगा अमन सेठ यांनी स्थानिक नगरसेवक आणि …

Read More »

आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षण सुरूच ठेवणार; टीडीपीची स्पष्टोक्ती

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता सेना पक्ष यांच्या युतीमध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) मुस्लिम आरक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. तेलगू देसम पक्षाचे नेते आर. रवींद्र कुमार यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण भविष्यातही कायम राहील, असे म्हटले आहे. …

Read More »