Sunday , July 26 2026
Breaking News

म. ए. समितीच्या लोकप्रतिनिधींमुळेच बेळगावात भाजपचा विजय : महांतेश कवठगीमठ

Spread the love

 

बेळगाव : नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्यामुळे जगदीश शेट्टर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले, अशी कबुली माजी आमदार महंतेश कवठगीमठ यांनी दिली.
शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कवठगीमठ म्हणाले की, निजदचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर व माजी नगरसेवकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळेच भाजपला इतके मोठे यश संपदान करता आले असे ते म्हणाले.
देशहितासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण दक्षिण मतदारसंघात मताधिक्य मिळाले, असे ते यावेळी म्हणाले.
ग्रामीण मतदारसंघात माजी आमदार संजय पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांनी अर्थक परिश्रम घेतले त्याचबरोबर दक्षिण मतदारसंघात आमदार अभय पाटील यांनी केलेल्या नियोजनबद्ध कार्यामुळे सर्वाधिक 73 हजाराहून अधिक मते भाजपला मिळाली. भाजप नेते व कार्यकर्ते त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच भाजपला हे यश संपादन करता आल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेश भाजपा अध्यक्ष सुभाष पाटील, श्रीमती गीता सुतार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *