Sunday , July 26 2026
Breaking News

जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिन

Spread the love

 

 

बेळगाव : दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन घोषवाक्य ठेवली जातात. 2024 चे घोषवाक्य म्हणजे “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे जेणे करून भावी पिढ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते” या राष्ट्रीय हेतूचा उद्देश साधून जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) व शहापूर येथील गोवावेस स्थित न्यू गर्ल्स हायस्कूलच्या सहकार्यातून तंबाखू विरोधी मोर्चाचे भव्य आयोजन दि. 8 जून रोजी करण्यात आले. याप्रसंगी न्यू गर्ल्स हायस्कूल येथे पार पडलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात स्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. यु. घाडी, शिक्षक वर्ग, जायंटसचे अध्यक्ष श्री. अविनाश पाटील, सेक्रेटरी श्री. यल्लाप्पा पाटील व जायंटसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. अविनाश पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले की, “आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांवर आहे. यासाठी जागृती कार्यक्रमांची गरज आहे.” मुख्याध्यापक श्री. घाडी यांनी देखील तंबाखू सेवनामुळे होणारे विकार याबाबत ची माहिती दिली.
या कार्यक्रमानंतर जायंट्स चे सदस्य, शिक्षक व विद्यार्थीनी यांची फेरी करण्यात आली. सुमारे साठ विद्यार्थिनीनी या फेरीत सहभाग घेतला. तंबाखू विरोधी सूचना देणारे फलक हातात घेतलेल्या विद्यार्थिनी बँडच्या तालावर घोषणा देत शहापूर भागात फिरल्या. याप्रसंगी जायंटसचे सभासद सर्वश्री शिवराज पाटील, अनंत लाड, लक्ष्मण शिंदे, आनंद कुलकर्णी, विजय बनसुर, संजय पाटील, दिगंबर किल्लेकर, प्रदीप चव्हाण, मधु बेळगावकर व हायस्कूल मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते. फेरीनंतर विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद महागावकर यांनी केले तर सचिव यल्लाप्पा पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *