Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

शैक्षणिक वर्षात राज्यात ५०० पब्लिक स्कूल : मंत्री मधु बंगारप्पा

  बंगळूर : आम्ही शैक्षणिक वर्षात कर्नाटकात ५०० पब्लिक स्कूल सुरू करणार आहोत, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी, पुढील ३ वर्षांत ३ हजार कर्नाटक पब्लिक स्कूल सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. म्हैसूर येथील काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आम्ही सीएसआर अनुदानांतर्गत पब्लिक स्कूल सुरू करणार …

Read More »

प्रज्वलचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला

  विमानतळावरच अटकेची शक्यता; ३१ रोजी होणार आगमन बंगळूर : सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेले हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे प्रज्वलला आता विमानतळावरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याने वकीलामार्फत आजच लोकप्रतिनीधी विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. बंगळुर येथील विशेष न्यायालयाने बुधवारी हसनचे खासदार …

Read More »

चन्नेवाडी शाळेला गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट

  खानापूर : चन्नेवाडी येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते, यासाठी मंगळवार दिनांक २८ मे रोजी श्रीमती कुडची यांनी सीआरपी …

Read More »

दत्त खुले नाट्यगृहाजवळील पाणी वापरात आणा

  निपाणी (वार्ता) : शहरात पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर कोडणी-गायकवाडी येथील खणीतील पाणी उपसा करून तलावामध्ये सोडण्याची मागणी होत आहे. याशिवाय शहरात असणाऱ्या दत्त खुले नाट्यगृहाजवळील तलावातील पाणी वापरात आणावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी केली आहे. पंकज गाडीवड्डर म्हणाले, इ.स. गेल्या चाळीस वर्षापासून येथील वड्डर समाज गायकवाडी येथील …

Read More »

खानापूर येथील जवानाचे निधन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील सैनिक मंजुनाथ अंबडगट्टी (वय ३५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 16 वर्षांपासून मंजुनाथ हे भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना दिल्लीतील मिलिटरी बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; खानापूर तालुका समितीच्यावतीने आवाहन

  खानापूर : 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता.१) रोजी सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही …

Read More »

हलगा-मच्छे बायपास विरोधातील स्थगिती उठवताच जेसीबी दाखल

  बेळगाव : हलगा- मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांनी सुमारे दीड दशके चालविलेल्या लढ्याची धार शेतकऱ्यांतील फुटीमुळे कमी होताना दिसत आहे. या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा मोबदला घेतला आहे तसेच बायपास रस्त्याचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नुकताच हलगा-मच्छे बायपास जमीन संपादन विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील स्थगिती उठवताच ठेकेदाराने …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात 12 जूनपर्यंत मनाई आदेश जारी

  कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु …

Read More »

पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल

  झिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महुलझीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोदल कछार गावात ही घटना घडली आहे. …

Read More »

सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

  सांगली : सांगलीच्या तासगाव – मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहाजणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन …

Read More »