खानापूर : 1986 मध्ये झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता.१) रोजी सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
भाषावार प्रांतरचना करण्यात आल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी मराठी भाषिक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तरीही कर्नाटक सरकारची दडपशाही आणि अत्याचार सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून पुन्हा एकदा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत होण्यासाठी कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.