धजदची सात जागांची मागणी; देवेगौडा, कुमारस्वामींची पंतप्रधान मोदींशी चर्चा बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतलेल्या धजद आणि भाजप यांच्यातील जागावाटप प्रक्रिया आज जवळपास अंतिम झाली. भाजप नेते लोकसभेच्या चार जागा धजदला देण्यास इच्छुक आहेत. दरम्यान धजदचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री …
Read More »जेएन.1 च्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा बेळगाव जिल्ह्यात आपण प्रभावीपणे सामना केला आहे. गेल्या वेळच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जेएन-1 कोविड म्युटंट स्ट्रेनचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगावातील बीम्स संस्थेच्या सभागृहात गुरुवारी आरोग्य …
Read More »संजू सॅमसनचे शतक अन् अर्शदीपचा मारा, भारताचा मालिका विजय
भारताने तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेत वन डे मालिका जिंकली होती. त्यानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज भारताने ही कमाल करून दाखवली. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड व महेंद्रसिंग धोनी यांनाही हा पराक्रम करता आला नव्हता. संजू …
Read More »हुक्केरीजवळ तीन बसेसवर दगडफेक : एक जखमी
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील बेनकनहोलीजवळ गुरुवारी रात्री तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, कर्नाटक परिवहन महामंडळाची एक बस आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली असून बसच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तिन्ही …
Read More »सेवेत कायम करण्यासाठी अतिथी व्याख्यात्यांचे बेळगावात आंदोलन
बेळगाव : सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी राज्य अतिथी व्याख्याता संघटनेच्या आदेशानुसार बेळगावात आज अतिथी व्याख्यात्यांनी आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांत अतिथी व्याख्याते म्हणून सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना अद्याप सेवेत कायम केलेले नाही. त्याशिवाय त्यांना सहा महिन्यांनी वेतन तेसुद्धा अपुरे दिले जाते. त्यात चरितार्थ चालवणे त्यांना कठीण झाले …
Read More »बेळगावमध्ये आढळला पहिला जेएन-1 कोविड रुग्ण
बेळगाव : बेळगावमध्ये पहिला जेएन-1 व्हायरसचा कोविड रुग्ण आढळला आहे. जेएन-1 कोविडचा पहिला रुग्ण आढळून आल्याने बेळगावात खळबळ उडाली आहे. केरळमध्ये कोविडच्या जेएन-1 व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्या पाठोपाठ या व्हायरसची लागण झाल्याने राजधानी बेंगळूरमधील एका ६४ वर्षीय रुग्णाचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी नुकतेच जाहीर …
Read More »कंग्राळी बुद्रुक येथे अनैतिक संबंधातून पत्नीकडून पतीचा खून?
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे अनैतिक संबंधातून पत्नीने पतीचा संशयास्पद खून केल्याची घटना घडली आहे. सुभाष कल्लाप्पा हुरुडे (वय ५६) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पत्नीनेच त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंग्राळी बुद्रुक येथील व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या सुभाष कल्लाप्पा हुरुडे याचा …
Read More »‘अरिहंत’च्या कुन्नुर शाखेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सहकारी संघाच्या कुन्नूर शाखेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महेंद्र जाधव यांनी स्वागत केले. सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांच्या हस्ते लक्ष्मी व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उत्तम पाटील यांना कर्नाटक सरकारकडून सहकारत्न पुरस्कार मिळाल्याने …
Read More »बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातर्फे हेल्मेटबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : दुचाकींच्या अपघातामध्ये हेल्मेट आभावी अनेक दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाणेतर्फे येथील कन्नड मुलांची शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते. प्रारंभी मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला यांनी स्वागत केले. उपनिरीक्षक डी. बी. …
Read More »श्रीरामलला मंदिर अक्षता कलश शोभायात्रेला निपाणीत उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : अयोध्या मधून येथे आलेल्या रामलला मंदिर अक्षता कलशांची शोभायात्रा अभूतपूर्व उत्साह व चैतन्यमय वातावरणात पार पडली. यामध्ये निपाणीसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी अक्षतांचा मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठविण्यासाठी ८० मंगल कलशांची बांधणी व सजावट केली होती. सायंकाळी तमनाकवाडा येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta