Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

शिंदोळी खुर्द येथे विठ्ठल रुखुमाई मंदिराचा उदघाटन सोहळा व कळसारोहण मोठ्या उत्साहात संपन्न

  खानापूर : मौजे शिंदोळी खुर्द तालुका खानापूर येथे बुधवार दिनांक 25 आणि 26 रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मंदिर जुने होते त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प गावातील सर्व युवावर्ग आणि ग्रामस्थांनी घेतला. जवळजवळ दोन ते अडीच वर्ष मंदिरचे काम चालू होते. …

Read More »

तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी प्रकाश मरगाळे तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची बिनविरोध निवड

  बेळगाव : बेळगाव शहरातील प्रतिष्ठित श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज बुधवारी बिनविरोध पार पडली. तुकाराम बँकेच्या चेअरमनपदी पुनश्च पाचव्यांदा प्रकाश मरगाळे यांची तर व्हा. चेअरमनपदी नारायण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक या बेळगाव शहरातील प्रतिष्ठित बँकांच्या संचालक मंडळाच्या …

Read More »

अमृत महोत्सव सत्कारमुर्ती व सहस्त्रचंद्र दर्शन सत्कारमूर्तींचा सत्कार!

  खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघाचा १४ वा अमृत महोत्सव सोहळा सोमवारी दि./३० डिसेंबर रोजी शिवस्मारकात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी अध्यक्ष विलास बेळगांवकर, पीएलडी बँक अध्यक्ष …

Read More »

कॅपिटल वन एकांकिका वेळापत्रक जाहीर

  बेळगाव : 13 व्या भव्य एकांकिका स्पर्धा दि. 4 व 5 जाने. रोजी होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. नीटनेटके आयोजन व पारदर्शकतेच्या जोरावर आंतरराज्य पातळीवर सदर स्पर्धा खूप मानाची मानली जाते. स्पर्धेतील रंजकता व दर्जा कायम ठेवण्यासाठी, स्पर्धक संघांची निवड आभासी पद्धतीने करण्यात येते. वैभवशाली …

Read More »

गडहिंग्लज अनिंसने नववर्षाचे स्वागत केले जटा निर्मूलनाने; गडहिंग्लज अनिंसचा अनोखा उपक्रम

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडहिंग्लच्या कार्यकर्त्यांनी एक जानेवारी रोजी येथील श्रीमती गौरव्वा गुरूलिंग मोळदी या 75 वर्षाच्या महिलेचे जटानिर्मूलन करून नववर्षाचे केले अनोख्या पद्धतीने स्वागत. गडहिंग्लज येथील नदीवेस परिसरात राहणाऱ्या श्रीमती गौरव्वा मोळदी या वृध्द महिलेच्या डोक्यावर तीन वर्षांपूर्वी केसांचा गुंता तयार होऊन भल्या मोठ्या जटेचे …

Read More »

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची आईने केली हत्या!

  बेळगाव : स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाची मुलीच्या आईनेच निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील उमराणी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीमंत इटनाळ नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत होता. रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि …

Read More »

इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूरची स्थापना

  मण्णूर : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कलमेश्वर हायस्कूल, मण्णूर येथे “इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूर” या नवीन इंटरॅक्ट क्लबचा स्थापना समारंभ डीजी आरटीएन शरद पै यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अधिष्ठाता अधिकारी आरटीएन ॲड. महेश बेल्लद उपस्थित होते. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे अध्यक्षा प्रीती चौगुले यांना …

Read More »

थर्टी फस्टला मद्यपींनी रिचवले ३०८ कोटींचे मद्य!

  बंगळूर : नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्या आणि इतर ठिकाणी मद्याला मोठी मागणी होती. थर्टी फर्स्टच्या केवळ अर्ध्याच दिवसात राज्य पेय महामंडळाने ३०८ कोटींची मद्यविक्री केली. यातून कोट्यवधींचा अबकारी कर वसूल झाला. गतवर्षी १९३ कोटींची मद्यविक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा दीडपट अधिक विक्री झाली. मंगळवारी (दि. ३१) राज्यातील …

Read More »

शेतकरी, कष्टकऱ्यांमुळेच सहकार टिकला : विलास बेळगावकर

  जांबोटी सोसायटीच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव खानापूर : आज सहकार क्षेत्र ऐन उमेदीत असताना ही चळवळ चालविणे कठीण झाले आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजांसाठी सहकार टिकणे आवश्यक आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांनीच सहकार टिकवला आहे. तो वाढवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे, असे मत जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी व्यक्त …

Read More »

राज्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील लोकांची आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक असमतोल आणि असमानता दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांनी वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जीवनातील चढ-उतार हे …

Read More »