Thursday , June 4 2026
Breaking News

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी

Spread the love

 

बेळगाव : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या अपघातात कंटेनर पलटी होऊन शेजारी सर्व्हिस रोडवर जाऊन पडल्याची घटना आज गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हालगा येथील धाब्या समोर घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा कंटेनर (क्र. एचआर 55 एटी 2040) मुंबईहून बेंगलोरच्या दिशेने पार्सल घेऊन निघाला होता. त्यावेळी हालगा येथील धाब्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला आणि महामार्गावरून थेट शेजारच्या सर्व्हिस रोडवर जाऊन पडला. सदर अपघात आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तुरळक वाहतुकीच्या वेळी घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *