Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर शिवाजीनगर दुचाकी अपघातातील मृताची संख्या दोन

  खानापूर : काल सायंकाळी खानापूर जांबोटी मार्गावरील शिवाजी नगर रेल्वे पुलावर काल शुक्रवारी दोन दुचाकींचा अपघात होऊन, यामध्ये रामगुरवाडी गावचा शंकर धाकलु गुरव जागीच ठार झाला होता. तर त्याचा काका रवळू गुरव व नागुर्डा येथील दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे, हे दोघे जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बेळगाव …

Read More »

बेलेकेरी खनिज प्रकरण : कारवारचे आमदार सतीश सैल यांना सात वर्षाचा कारावास

  ४४ कोटी रुपये दंड बंगळूर : कारवारमधील काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांना बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याना आता ७ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असून न्यायालयाने त्याना ४४ कोटीचा दंडही ठोठावला आहे. बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सैल यांना …

Read More »

शहापूर म. ए समिती कार्यकर्त्यांची काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक

  बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक बोलवण्यात आली. बैठकीस अध्यक्षस्थानी शिवाजी हावळानाचे होते. समिती नेते नेताजी जाधव, शुभम शेळके यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर यांनी मनोगत व्यक्त केले, बैठकीस सुनिल बोकडे, उमेश भातकांडे, मनोहर शहापूरकर, चंद्रकांत मजुकर, कुणाल कोचेरी, अतुल पारिशवाडकर, प्रकाश …

Read More »

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला निवड

  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी सिद्धी कुगजी हिने 600 मी रनिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर 3000मी रनिंग मध्ये मनश्री कुगजी प्रथम तर कनिष्का कुंडेकर 100 मी रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 4×400 मी रिलेमध्ये मनश्री कुगजी, रागिणी हट्टीकर, …

Read More »

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे. तसंच खडकवासला मतदारसंघाबाबतचाही सस्पेन्स संपवत विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. …

Read More »

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; चंदगडमधून नंदाताई बाभूळकर

मुंबई : शरद पवार गटाने दुसरी यादी जाहीर केली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी आता एकूण 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत बीडमध्ये संदीप क्षिरसागर …

Read More »

काळा दिन, महामेळाव्याला परवानगी देऊ नका…

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1 नोव्हेंबरला काळ्या दिनाला परवानगी देऊ नये आणि हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करू देऊ नये, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिका शिवराम गौडा गटाच्या वतीने आज बेळगाव येथे आंदोलन करण्यात आले. आज बेळगाव येथे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवराम गौडा गटाने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल …

Read More »

शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

  मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज १५ …

Read More »

भाजपचे स्टार प्रचारक ठरले, ४० जणांची तोफ धडाडणार!

  नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आलाय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आलेय. भाजपचे बहुतांशी राज्यातील मुख्यमंत्री यांचा देखील स्टार …

Read More »

कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार

  बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा दिनाची फेरी काढली होती. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे यावेळी ही सायकल फेरी काढली जाणार आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, अशी माहिती शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. आम्ही ६८ वर्षांपासून काळा …

Read More »