Monday , September 21 2026
Breaking News

होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलिसांचे पथसंचलन

Spread the love

 

बेळगाव : होळी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल बुधवारी रात्री मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत पथसंचलन करून नागरिकांना दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.

मार्केट पोलिसांनी काल बुधवारी सायंकाळी खडेबाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली, जालगार गल्ली, खडक गल्ली, घी गल्ली, शास्त्री चौक, नाना पाटील चौक वगैरे भागात पथसंचलन करून जनतेला होळी व रमजान सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *