Monday , September 21 2026
Breaking News

बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना आकाश चौगुले यांचे मार्गदर्शन

Spread the love

 

 

बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा ताण- तणाव न बाळगता, न डगमगता तणाव विरहित परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. आपली उत्तर पत्रिका हा आपला आरसा असतो म्हणून उत्तर पत्रिका सोडविताना स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी सोडवावी. कारण आपल्या उत्तर पत्रिकेवरूनच आपले मूल्यमापन मूल्यमापक करत असतो. मूल्यमापकावर चांगली छाप पाडण्याचे काम आपली उत्तर पत्रिका करत असते. तीन तासाचा पेपर वेळेत पूर्ण कसा होईल याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रश्न पत्रिका सोडविण्याचा व लिहिण्याचा सराव केला पाहिजे व गुण बघून ते उत्तर लिहिले पाहिजे. अशा अनेक महत्त्वाच्या सूचना करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर संयोजक श्री. शंकर चौगुले माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, राजू मुजावर, दशरथ पाऊसकर, सुनील जाधव सर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार रश्मी पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *