Sunday , September 20 2026
Breaking News

अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मिडीयम शाळेत प्राचार्या सौ. चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मुलांच्या पालखी दिंडी सोहळ्यासह माऊली अश्वाचार रिंगण सोहळा पार पडला.
विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन झाले. त्यानंतर टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पालखी दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी संत परंपरेतील विविध भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. हातात भगवे झेंडे, टाळ-मृदुंगाचा नाद आणि मुखातून घुमणारा “ज्ञानोबा-तुकाराम, पांडुरंग हरी, जय जय राम कृष्ण हरीचा नामघोष झाला. त्यानंतर आश्वाचा रिंगण पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतना चौगुले यांचे मार्गदर्शन आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *