Sunday , September 20 2026
Breaking News

माळमारुती पोलिसांकडून ४६ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत; CEIR पोर्टलचा प्रभावी वापर

Spread the love

 

बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल ४६ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (Central Equipment Identity Register – CEIR) पोर्टलच्या माध्यमातून ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

माळमारुती पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल केल्यानंतर पोलिसांनी CEIR पोर्टलच्या साहाय्याने मोबाईल शोधण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार विविध कंपन्यांचे एकूण ४६ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात आले.

शनिवार, २६ जुलै २०२६ रोजी हे सर्व मोबाईल त्यांच्या संबंधित मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मालमारुती पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बी. आर. गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आनंद आदगोंडा, पीएसआय श्रीशैल हुलगेरी, पीएसआय उदय पाटील आणि पीएसआय पी. एम. मोहिते यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *