Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

बेळगावकडे येणाऱ्या बसची एक्टिव्हाला धडक; मायलेकीचा मृत्यू

  होन्नावर : मंगळूरहून बेळगावकडे येणाऱ्या केएसआरटीसी बस आणि एक्टिव्हा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आई व मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मानकी येथील गुळदकेरीजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सविता राजू आचारी (वय 40) आणि मुलगी अंकिता (वय 17) राहणार नाडवरकेरी, मावळी मुरडेश्वर या मायलेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत …

Read More »

बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्यावर काळाचा घाला

  खानापूर : करंबळ आणि बेकवाड येथील यात्रा आटोपल्यानंतर रूमेवाडीतील आपल्या बहिणीची भेट घेऊन घरी परतणाऱ्या इसमाचा अपघातात मृत्यू झाला. नारायण भगवंत पाटील (वय 47, राहणार : माडीगूंजी ता. खानापूर) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदगड येथील महात्मा गांधी हायस्कूल समोर हा अपघात घडला. नारायण भगवंत पाटील हे …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात मराठी भाषिकांतून तीव्र संताप

  तातडीची बैठक घेण्याची समिती कार्यकर्त्यांची मागणी बेळगाव : राज्य सरकारने व्यावसायिक आस्थापने फलकांवर 60 टक्के कन्नड भाषेची सक्ती व उर्वरित 40 टक्क्यांमध्ये इतर भाषेत लिहिण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत विधानसभेत तसे विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेचे अधिकारी काल दिवसभरात बेळगाव शहरातील इतर भाषेतील फलक हटविण्याची …

Read More »

मराठा मंडळ हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान

  निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी संगीता रविंद्र कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून कुर्ली सिद्धेश्वर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते. के. एस. देसाई यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर …

Read More »

मेंढपाळाच्या मुलाची सैन्य दलात भरारी

  बेनाडीच्या मारुती हजारेचे यश‌ : दीडच वर्षात मिळवले यश निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून सैन्य दलात भरती होण्यासाठी अनेक युवक सराव करीत आहेत. त्यामध्ये अनेक जण यशस्वी होत आहेत. बेनाडी येथील मेंढपाळ व्यवसायिक आप्पासाहेब हजारे यांचा मुलगा मारुती हजारे यांनी केवळ दीड वर्षाच्या सरावानंतर त्याची सैन्य दलात निवड …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात महाराष्ट्र सरकारकडे समितीची तक्रार!

  बेळगाव : कर्नाटक सरकारने व्यवसाय करणाऱ्या दुकानावरील फलकावर 60% कन्नड लिहिणे सक्तीचे केले आहे. याबाबत बेळगाव महानगरपालिका आपल्या अधिकाऱ्यांना आस्थापनाकडे पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबित आहे. बेळगावमधील बहुतेक भागात फलक मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत परंतु बेळगाववर कन्नडचे प्राबल्य दाखविण्याकरता कर्नाटक सरकारने काही कन्नड संघटनांना हाताशी धरून मराठी माणसांना  …

Read More »

अनगोळ येथील ‘जय महाराष्ट्र’ फलक हटविण्याच्या मागणीसाठी करुनाडू विजयसेनेची निदर्शने

  बेळगाव : बेळगावातील अनगोळ येथील ‘जय महाराष्ट्र’ फलक हटविण्याच्या मागणीसाठी करूनाडू विजयसेनेच्या वतीने आज बेळगाव महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील सर्व आस्थापने, दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकूर लिहिण्याची सक्ती कर्नाटक सरकारने केली आहे. तेव्हापासून बेळगावात कन्नड नामफलकांवरून कन्नड संघटनांची वळवळ वाढली आहे. शहरातील व्यापारी-व्यावसायिकांनी आपापल्या ग्राहकांना समजेल अशा …

Read More »

हैदराबादहून बेळगावकडे येणारी खासगी बस उलटली; 10 प्रवासी गंभीर जखमी

  गंगावती : हैदराबादहून बेळगावला जाणारी खासगी बस गंगावती तालुक्यातील हेमगुड्डा एचआरजी नगरजवळ उलटली, यात 10 प्रवासी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाला चुकवण्यासाठी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. बसमधून 50 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 10 जण गंभीर जखमी झाले. 8 जणांवर गंगावती शासकीय रुग्णालयात …

Read More »

राज्यातील वीज दरात कपात; वीज ग्राहकांना आनंदाची बातमी

  बंगळूर : राज्यातील वीज ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिलेली असतानाच, पुन्हा वीजेचे दर कमी करून वीज ग्राहकांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सरासरी १०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर आकारण्यात येणारे विजेचे दर कमी करण्यात आले आहेत. अशा ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटवर एक रुपये १० पैशांची कपात …

Read More »

झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, 12 जण गाडीखाली चिरडले

  जामताडा : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त झालेले सर्व प्रवासी अंग एक्सप्रेसने प्रवास करत होते. या दरम्यान कुणीतरी रेल्वे गाडीत …

Read More »