निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती (ग्रामीण) निपाणी, जिल्हा बेळगाव, कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाचे कार्याध्यक्ष अजित गणू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. निपाणी मतदारसंघामध्ये अजित पाटील यांनी युवा समिती कार्याध्यक्ष पदाला न्याय देण्याचे योग्य काम केले आहे. अध्यक्षपदी बंडा तुकाराम पाटील-मतीवडे, कार्याध्यक्षपदी …
Read More »ऊसाची थकबाकी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत मुदत
बेळगाव : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना २५ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची थकीत बिले अदा करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत. आज बुधवारी (१९ जून) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांच्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण २८ साखर कारखाने असून त्यापैकी ३ साखर कारखान्यांकडे …
Read More »मराठा सेवा संघ बेळगावतर्फे मांईंड ट्रेनर सेमिनार
बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगावतर्फे शनिवार दिनांक १५-०६-२०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत सैनिक भवन येळ्ळूर येथे प्रसिध्द मांईंड ट्रेनर शिवश्री विनोद कुरडे (कोल्हापूर) (माईंड ट्रेनर व मोटिवेशनल स्पिकर) यांचे विद्यार्थी व पालकांसाठी माईंड पॉवर सेमिनार आयोजित केले होते. त्यावेळी महाराष्ट्र हायस्कुल येळ्ळूर, चांगळेश्वरी हायस्कुल येळ्ळूर, …
Read More »कावळेवाडीचा पै. रवळनाथची राष्ट्रीय स्तरावर निवड
बेळगाव : कावळेवाडी येथील पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने दावणगिरी येथे नुकत्याच झालेल्या १७ वर्षे खालील कुस्ती स्पर्धेत ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकाविले. पुढील महिन्यात उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे. रवळनाथ हा बेळगुंदी बालवीर प्रशालेत दहावी वर्गात शिकत …
Read More »नागरिकांना विश्वासात घेऊन विकासाची कामे करा; मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : जिल्ह्यासाठी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड, घनकचरा व्यवस्थापन युनिट, चोवीस पाणी योजना (24×7) यासह जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या मोठ्या प्रकल्पांशी कामांची माहिती दिली. त्याचबरोबर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाचे विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या आणि विकास कामे करा, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव …
Read More »खासदार जगदीश शेट्टर यांची संपादकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
बेळगाव : बेळगाव जिल्हा व प्रादेशिक वृत्तपत्र संपादक संघाच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. संपादक असोसिएशनचे अध्यक्ष मुरुगेश शिवपूजी, उपाध्यक्ष हिरोजी मावरकर, सरचिटणीस संपतकुमार मुचलंबी, ज्येष्ठ संपादक एस.बी. धारवाडकर, मनोज कालकुंद्रीकर, राजेंद्र पोवार, शिव रायप्पा यळकोटी, कुंतीनाथ कलमणी, श्रीनिवास मावरकर, मतीन धारवाडकर आदी उपस्थित …
Read More »लोकसभा अध्यक्षपदावरून भाजप बॅकफूटवर
नवी दिल्ली : देशाच्या 18व्या लोकसभेसाठी 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण होणार? याबाबत चर्चा सुरू आहे. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की भाजपने आपल्या मित्र पक्षाला संधी दिली पाहिजे. एनडीए सरकार असल्याने यावेळी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचा घटक असेल. मागील दोन …
Read More »शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने तिथीनुसार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदु तिथीनुसार (जेष्ठ शु.द्वादशी जयंती) साजरी करण्यात आली. यानिमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान …
Read More »प्रज्वल रेवन्ना यांची आईच अत्याचार पीडितांचे अपहरण करायची; एसआयटीचा उच्च न्यायालयात खुलासा
बंगळुरू : प्रज्वल रेवन्ना प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने उच्च न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. आरोपी माजी जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांची आई, भवानी रेवन्ना, लैंगिक छळातील पीडितांचे अपहरण करायची. पीडितांना पोलिसात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी त्या त्यांच्या संपर्कात होत्या, अशा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलाय. दरम्यान …
Read More »पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; ५ महिला जागीच ठार
पंढरपूरमध्ये भीषण अपघात झाल्याच समोर आला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ येथे हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta