बेळगाव : कर्नाटकातील मंगळूर येथील मंगला क्रीडांगणावर झालेल्या दक्षिण आशियाई मास्टर अथलेटिक्स खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत उचगाव गावचे सुपुत्र आणि राणी चन्नम्मा नगर येथील रहिवासी सुरेश देवरमणी (वय ७३) यांनी अतुलनीय कामगिरी करताना २ काश्यपदक संपादन केले. ७० वर्षावरील गटात सुरेश देवरमणी यांनी ५ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत (२५ मिनिटात) दुसऱ्या क्रमांकासह तर १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत (६:५८ मिनिटात) दुसऱ्या क्रमांकासह कास्य पदक संपादन केले. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, जपान या देशातील नावाजलेल्या धावपटूंनी या दक्षिण आशियाई मास्टर अथलेटिक्स खुल्या चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतला होता.