Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

भरपाई द्या, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

  अतिवाडमधील शेतकरी; नेत्यांच्या सद्बुद्धीसाठी फोडले ११ नारळ बेळगाव : तलाव निर्मितीसाठी बेक्कीनकेरी (ता. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील अतिवाड गावात १५ वर्षांपूर्वी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, त्या मोबदल्यातील भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्याचा निषेध नोंदवत भरपाई द्या, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा अतिवाड ग्रामस्थ आणि राष्ट्रीय रयत संघातर्फे …

Read More »

निपाणी येथील न्यायालयातील अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे नागरिकांची गैरसोय

  निपाणी (वार्ता) : शहरातील न्यायालय इमारत ही भव्य व दिव्य असून नगरीच्या सौदर्यात व वैभवात भर घालणारी आहे. पण या न्यायालयात असणाऱ्या स्वच्छतागृहांचा योग्य प्रकारे वापर न झाल्याने तेथील अस्वच्छता पाहण्यासारखी झाली आहे. याशिवाय गुटखा, मावा, पान चघळून पिचकारी मारून रंग कामच केले आहे. त्यामुळे स्वछतागृह असूनही तेथील अस्वच्छता …

Read More »

“शाहू” कागलची एकरक्कमी एफआरपी रूपये 3100 रुपये जाहीर

  उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांची माहिती कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफआरपी रू. 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर करणे येत आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे …

Read More »

‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023″ हा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर

  ५ नोव्हेंबर रोजी दिला जाणार हा पहिलाच मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार कागल (प्रतिनिधी) : मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील “हेमलकसा” सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक गरज म्हणून गेली 50 वर्षे आदिवासी जनतेला आणि वंचित व उपेक्षित घटकांना अखंडित सामाजिक सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांना यावर्षीच नव्याने सुरू केलेला …

Read More »

1 नोव्हेंबरच्या मूक मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो शिवसैनिक सहभागी होणार

  कोल्हापूर : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. त्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे. गेल्या 67 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत …

Read More »

महाराष्ट्राचे तीन मंत्री आणि खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी

  बेळगाव : महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहर आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितिच्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनी सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता असल्याने …

Read More »

मराठा आरक्षणाला पाठबळ देण्यासाठी देवरवाडी येथे कँडल मोर्चा

  शिनोळी : मराठा आरक्षण कायमस्वरुपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी आज दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी देवरवाडी ता.चंदगड सायं. ८ वा कँडल मोर्चा काढण्यात आला. गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली. “मनोज जरांगे -पाटील …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच दलितांना मानाचे स्थान

  राजेंद्र वड्डर – पवार : गळतगा येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन निपाणी (वार्ता) : देशाच्या स्वातंत्र्यानंतर समाजाकडून मूर्तीची निर्मिती आणि मंदिरांची निर्मिती करण्यात येत असते. पण त्यांनाच मंदिरात देव दर्शनासाठी प्रवेश नाकारला जात होता. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह करून दलितांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले. त्यामुळेच …

Read More »

संत मीरा शाळेच्या अभिषेक, अनिरुद्ध, भावना यांची राज्य स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अभिषेक गिरीगौडर, अनिरुद्ध हलगेकर, भावना बेरडे यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या जिल्हास्तरीय अथेलिटीक स्पर्धेत प्राथमिक गटात संत मीरा शाळेच्या भावना बेरडे हिने 100 मीटर …

Read More »

यल्लम्मा देवस्थान परिसरात चांगल्या सोयी -सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लमा देवी मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सोयी -सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे शहरातील महिला भाविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. माजी नगरसेविका सुधा भातकांडे आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी …

Read More »