Friday , November 6 2026
Breaking News

लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही : प्रकाश हुक्केरी

Spread the love

 

बेळगाव : मागच्या वेळी मी मंत्री असताना लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून मंत्रिपद गमावले. आता मी विधानसभेचा सदस्य आहे. आता मी लोकसभेची निवडणूक फुटबॉल म्हणवून लढवणार नाही, असे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले.

चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिक्षकांच्या सेवेसाठी मला शिक्षकांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडून दिले आहे. माझा अजून पाच वर्षांचा कार्यकाळ आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मला 5 वर्षांची गरज आहे. सिद्धरामय्या यांनी लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी दिली, तर मी लढणार नाही. हायकमांडने कितीही दबाव आणला तरी मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनचा कार्य सुरू ठेवणार आहे

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *