बंगळूर : बंगळूरमधील वीरभद्रनगर येथील बस डेपोमध्ये पार्क केलेल्या २० खासगी बसेसना मोठी आग लागली. ही घटना आज (दि.३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. बंगळूरमधील वीरभद्र नगरमधील गॅरेजजवळील बस डेपोला लागलेल्या आगीत उभ्या असलेल्या सुमारे २० खासगी बसेस जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून …
Read More »सीमाप्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जवळपास आठ महिन्यानंतर या खटल्याला गती मिळाली आहे. मागील 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये सुनावणी झाली होती त्यानंतर 1 नोव्हेंबर काळ्यादिनी सीमाप्रश्नी सुनावणी असल्यामुळे सीमावासीयांसाठी हा औत्सुक्याचा क्षण ठरणार आहे. तांत्रिक …
Read More »आबासाहेब पाटील यांच्या कवितांनी रसिक भारावले
शब्दगंध कवी मंडळाचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न बेळगाव : पोटातील आतडी जागी होतात तेंव्हा अमेझॉनचं खोरं तोकडं पडतं साहेब भाकरी इतकं सुंदर बेट ऐकीवात नाही माझ्या अशा बेकारीच्या झळीने बसणाऱ्या तीव्र चटक्याची जाणीव देणाऱ्या कविता आबासाहेब पाटील यांनी सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. येथील शब्दगंध कवी …
Read More »बेळगावात भ्रष्ट अधिकार्यांवर लोकायुक्त छापा
बेळगाव : भ्रष्ट अधिकार्यांच्या विरोधात लोकायुक्त अधिकार्यांनी आज सकाळी सकाळी दोन अधिकार्यांवर छापा टाकला. बेळगाव पंचायत राज विभाग एईई एम. एस. बिरादार यांच्या घरावर लोकायुक्त एसपी हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली डीएसपी जे. रघू यांच्या पथकाने घरावर छापा टाकला. बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून लोकायुक्तांनी विश्वेश्वरय्या नगरमधील श्रद्धा अपार्टमेंट तसेच कित्तूर …
Read More »भारताच्या विजयी ‘षटकार’, इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताचा सलग सहावा विजय
लखनऊ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाने घोडदौड कायम राखताना विजयी षटकार खेचला. २२९ धावांचा बचाव भारतीय संघ करेल की नाही अशी शंका मनात आली होती, पण मोहम्मद शमीने (४-२२) पुन्हा एकदा कमाल केली. जसप्रीत बुमराह ( ३-३२), कुलदीप यादव (२-२४) आणि रवींद्र जडेजाची (१-१६) त्याला साथ …
Read More »आंध्र प्रदेशात दोन ट्रेनचा भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी
आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेन एकमेकांवर आदळून मोठी दुर्घटना घडली आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची एकमेकांसोबत टक्कर झाली आणि रेल्वेचे तीन डबे घसरले. या भीषण रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यासोबतच या दुर्घटनेत 50 जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन
खानापूर : संपूर्ण भारत देशामध्ये 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्यात आली. या प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्राचा एक मोठा मराठी भाषिकांचा भूभाग केंद्र सरकारने कर्नाटकाला जोडून मराठी भाषिकावर घोर अन्याय केला. या अन्यायाविरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून एक नोव्हेंबर हा काळा दिन पाळला जातो त्या दिवसापासून आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिक एक नोव्हेंबर …
Read More »शाळा सुधारणा समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शाळा सुधारणा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना उद्या सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० निवेदन देण्यात येणार असून शाळेतील विविध समस्या त्वरित सोडवाव्यात आणि शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी बेळगाव तालुक्यातील सर्व शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण प्रेमी यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. सरकारी शाळेमध्ये …
Read More »जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा विषयावर शिबिराचे आयोजन
डॉ. माधव प्रभू यांनी केले महिला भगिनींना मार्गदर्शन बेळगाव (प्रतिनिधी) : जॉननाथन फाउंडेशनच्यावतीने महिलांमधील उच्च रक्तदाब आणि रक्त शर्करा या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वडगाव येथील जय जवान हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केएलई इस्पितळाचे डॉक्टर आणि प्राध्यापक माधव प्रभू उपस्थित होते. इंडियन मेडिकल …
Read More »1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; म. ए. समितीतर्फे खानापूरात जनजागृती
खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे बहुसंख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta