Monday , September 21 2026
Breaking News

मतदार याद्या मराठीत पुरवा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे युवा समितीची तक्रार

Spread the love

 

बेळगाव : अलीकडेच बेळगावच्या प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, सदर यादी फक्त कन्नड भाषेत प्रसिद्ध केल्याने मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सन २००८ साली विविध राज्यातील अल्पसंख्याक भाषिकांना त्यांच्या भाषेत सुविधा पुरविण्यासाठी मतदारसंघनिहाय अभ्यास करून केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिनांक १६/०९/२००८ रोजी सर्व राज्यांच्या आयुक्तांना आपल्या राज्यात जे भाषिक अल्पसंख्याक नागरिक आहेत त्यांना निवडणूक संदर्भात देण्यात येणारी सर्व कागदपत्रे त्यांच्या भाषेत पुरविण्यासाठी सक्त आदेश दिले होते. जानेवारी २०२३ मध्ये देखील प्रशासनाने फक्त कानडी भाषेत मतदार याद्या उपलब्ध केल्या होत्या. म. ए. युवा समितीच्या वतीने मराठी मतदार याद्या पुरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश देताच लागलीच प्रशासनाने मराठी याद्या उपलब्ध केल्या होत्या. पण यंदा देखील बेळगावचे प्रशासन जाणूनबुजून मराठीला डावलून फक्त कानडी भाषेत मतदार याद्या प्रसिद्ध केल्याने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बेळगावच्या प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे, मतदार याद्या मराठी मध्ये पुरविण्यासाठी आवश्यक निर्देश राज्य निवणूक आयोगाला तसेच बेळगावच्या प्रशासनाला करावी अशी केंद्रीय निवडणूक आयोगा कडे मागणी केली आहे. यासोबतच मतदार नोंदणी अर्ज, उमेदवारी अर्ज तसेच निवडणूक कागदपत्रे मराठीत पुरवावी ते पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *