बेळगाव : केरेगोडू गावात रामभक्तांनी फडकवलेला अंजनेय ध्वज राज्य सरकारने काढून टाकला आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला, असा आरोप राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी केला. बेळगावजवळील एमके हुबळी आणि मंड्या जिल्ह्यातील केरेगोडू गावात भगवे ध्वज आणि श्रीरामाचे पोस्टर काढून टाकल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा भारतीय जनता …
Read More »भेदभाव न करता विकास कामे करणार
माजी आमदार काकासाहेब पाटील : हजरत राजेबागस्वार दर्गा विकास कामास प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्य सरकारच्या वक्फ खात्याकडून जत्राट येथील श्रध्दास्थान हजरत राजेबागस्वार दर्गा विकासासाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »निपाणीत वळूंच्या दहशतीमुळे नागरिक भितीच्या छायेखाली
निपाणी (वार्ता) : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील नेहरू चौकात झालेल्या दोन वळुंच्या झुंजीत दुकान व वाहनांचे नुकसान झाले आहे. वर्षापूर्वी याच ठिकाणी झुंज लागून नागरीक जखमी झाले होते. याशिवाय कोठीवले कॉर्नरजवळ थांबलेल्या महिलेस वळूने धक्का मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या गंभीर घटनेकडे …
Read More »भारतीय संविधान सामाजिक समतेचे प्रतीक : प्रा. सुरेश कांबळे
गव्हाण येथे डॉ. आंबेडकर युवा संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : भारतीय समाजात हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा अशा प्रस्थापित व्यवस्थेमध्ये केवळ एक वर्ग सोडून शेतकरी, कामगार, शोषित, वंचित, पीडित व स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वविचाराचे अधिकार प्राप्त झाले नव्हते. अशा प्रवृत्तीमुळे एकाधिकारशाही निर्माण होऊन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मानवी मूल्य पायदळी …
Read More »कॅपिटल वन 12 वी एकांकिका स्पर्धा 3 व 4 फेब्रुवारीला
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग बाराव्या वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यामधील संघांचे अभासी तत्वावर निवड झालेल्या दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये होणार असून, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरविण्यात येणार …
Read More »कर्नाटकात हनुमान ध्वज हटवण्यावरुन पेटला वाद, सिद्धरामय्या सरकारविरोधात भाजपा आक्रमक
मांड्या : कर्नाटकातल्या मांड्या जिल्ह्यातल्या केरागोडू गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. १०८ फूट उंच स्तंभावरुन हनुमान ध्वज हटवण्यात आल्याने वाद पेटला आहे. या वादाने राजकीय वळण घेतलं आहे. भाजपा नेते, कार्यकर्ते विरुद्ध कर्नाटक सरकार असा वाद पेटला आहे. त्यामुळे या गावात कलम १४४ लागू करण्यात आलं …
Read More »सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी झालेल्या सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उडुपी येथील कामाक्षी भट्ट आणि हेमंत भट्ट अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. बसवन गल्ली येथे रविवारी सायंकाळी एका घरात …
Read More »महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र
बेळगाव : मुंबई वाशी येथे दुसरे विश्व मराठी संमेलन सुरू आहे. मराठी भाषा संवर्धनाबाबत संमेलनात काही निर्णय घेण्यात येतील आणि त्याचा उपयोग मराठी भाषिकांना होईल यात संशय नाही. संमेलनास महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 67 वर्षे लढा देत …
Read More »शालेय बस आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू
बागलकोट : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील आळगुरु गावात शालेय वाहन आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आळगुरु गावातील श्री वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …
Read More »बेळगाव बसवाण गल्लीत सिलेंडर स्फोट; ५ जण गंभीर जखमी
बेळगाव : सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. बेळगाव बसवण गल्ली येथे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ललिता भट्ट (वय ४८), मोहन भट्ट (वय ५६), कमलाक्षी भट्ट (वय ८०) , हेमंत भट्ट (वय २७), गोपीकृष्ण भट्ट (वय ८४) अशी स्फोटात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta