मंत्रिमंडळाचा निर्णय; सीएनजी, पीएनजी गॅस धोरण तयार करणार बंगळूर : वाहनांसाठी सीएनजी आणि घरगुती वापरासाठी पीएनजी वापरण्यासाठी राज्य गॅस धोरण तयार करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे, अशी माहिती कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी गुरुवारी दिली. राज्यात १०० ग्राम न्यायालयांच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ …
Read More »आप्पाचीवाडी हालसिध्दनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता
कोगनोळी : श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथे दिनांक 28 पासून सुरू होणाऱ्या श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त हालसिद्धनाथ मंदिर व परिसर गाड्या पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून लाखो भाविक देवदर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करून भाविकांच्या गाड्या, दुकाने, पाळणे इत्यादी …
Read More »जनवाड महादेव स्वामी मठातील कोतवाल अश्व अनंतात विलीन
निपाणी (वार्ता) : जनवाड येथील श्री महादेव स्वामी धर्मर मठाच्या देवाचे कोतवाल अश्वाचे गुरुवारी (ता.१९) निधन झाले. कन्हैया नामक आश्र्वाच्या निधनामुळे जनवाड गावासह भाविकांवर शोककळा पसरली आहे. जनवाड धर्मर मठात देव पूजेसाठी असणाऱ्या कोतवालांना विशेष असे महत्त्व आहे. दिवसातून चार वेळा या कोतवालांची पूजा केली जाते. मठात जागृत दैवत …
Read More »मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ, कुत्र्याला रंगविले चक्क बिबट्याच्या रंगाप्रमाणे
बेळगाव : शनी मंदिर परिसरात एका कुत्र्याला बिबट्याप्रमाणे रंगविण्याचा प्रकार घडला आहे. काही उपद्रवी लोकांनी स्वतःच्या मनोरंजनासाठी चक्क मुक्या प्राण्याला ऑईलपेंट लावून बिबट्या प्रमाणे रंगविले. रंग लावल्यामुळे सदर कुत्र्याच्या सर्वांगाला खाज सुटली आहे त्यामुळे ते आपले अंग खाजवत सर्वत्र फिरत होते. अंग खाजवल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या ही …
Read More »कुन्नूर येथील घरकुल लाभार्थीनी घेतली काकासाहेब पाटील यांची भेट
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्या काळात २०१९-२० आणि २०२१-२२ सालात कुन्नूर येथील अनेक घरांची पडझड झाली होती. त्याचे सर्वेक्षण झाल्यानंतर नुकसानग्रस्त घरासाठी लाभार्थी ठरले होते. पण मोजक्याच नागरिकांना घरे मंजूर झाली. पात्र असूनही बऱ्याच लोकांना मदत न मिळाल्यामुळे कुन्नूर येथील लाभार्थ्यांनी ग्राम पंचायत समोर उपोषण केले. कुन्नूर …
Read More »नागुर्डा येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ!
खानापूर : नागुर्डा (तालुका खानापूर) येथील श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव कमिटी नागुर्डा यांच्यावतीने सालाबादप्रमाणे १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुर्गामाताची प्रतिष्ठाना करण्यात आली. सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीमंत सरकार श्री. निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. अध्यक्ष म. ए. समिती खानापूर श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, …
Read More »महानगरपालिकेची मराठी फलकावर पुन्हा वक्रदृष्टी
बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज चौकात महानगरपालिकेने अचानक पणे व्यावसायिक आस्थापनावरील मराठी फलक तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ गणेशोत्सव मंडळाचे फलक हटवण्याही मोहीम सुरु केली, सदर बातमी कळताच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी धाव घेऊन महानगरपालिकेची मोहीम अडविली. उपस्थित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर मोहीम राबवून कायद्याचे उल्लंघन का …
Read More »हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने २२ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
कागलमध्ये खास समारंभात होणार पुरस्कार वितरण कागल (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता मटकरी …
Read More »निपाणीत उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.२०) सकाळी १० ते १ यावेळेत मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल, (रोटरी …
Read More »सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार राजवाड्यात कुंकूमार्चन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी ललित पंचमी निमित्त कुंकुमार्चनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या दिवशी आई तुळजाभवानीचे रूप आमराईमध्ये चोपड्यावर खेळत असलेले रूप दाखवले होते. श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते कवळ पूजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta