Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

हिट अँड रन कायद्याच्या विरोधात बेळगावात ट्रक चालक-मालकांची निदर्शने

  बेळगाव : केंद्र सरकारच्या फौजदारी संहितेअंतर्गत केलेल्या हिट अँड रन प्रकरणात चालकांना 7 लाखांचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा ठोठावन्याची तरतूद असलेला 2023 चा हिट अँड रन केस कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा लॉरी ड्रायव्हर्स असोसिएशनने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले. केंद्र सरकारने नुकत्याच पारित …

Read More »

हुतात्मादिनी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबई येथे जोरदार निदर्शने

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी १७ जानेवारी आणी १ जून हे दिवस हुतात्मा दिन म्हणून मोठ्या गांभीर्याने पाळले जातात. गेल्या दोन वर्षांपासून मराठी भाषिकांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू असून सीमाप्रश्न न्यायालयात आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या …

Read More »

बेळगाव तालुका समितीच्यावतीने हुतात्मा दिन गांभीर्याने

  बेळगाव : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी भाषावर प्रांतरचना करण्यात आली, त्यावेळी मुंबई राज्यातला मराठी भूभाग त्यावेळच्या म्हैसूर राज्यात अन्यायाने डांबण्यात आला. १७ जानेवारी १९५६ रोजी ही वार्ता नभोवाणीवरून कळविण्यात आली तेव्हा बेळगावमध्ये झालेल्या पहिल्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्रसाठी पहिले पाच हुतात्मे बेळगाव परिसरात झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

  बेळगाव : पोलीस संरक्षणात काही कन्नड संघटना मराठी भाषिकांवर अन्याय करत आहेत. पोलीस संरक्षण बाजूला काढले तर त्यांची ही हिंमत होणार नाही. त्यामुळे त्यांनी मराठी माणसाचा नाद करू नये असा इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी दिला. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कासाठी सीमालढ्यात प्राणांची आहुती …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा कै. नागाप्पा होसूरकर, कुप्पटगिरी यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कै. पैलवान मारूती बेन्नाळकर, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बारागडी, कै. लक्ष्मण गावडे आणि निपाणीतील कै. श्रीमती …

Read More »

केंद्र सरकारचा ‘हिट अँड रन’ कायदा रद्द करा

  निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटना; तहसीलदारामार्फत पंतप्रधानाना निवेदन निपाणी (वार्ता) : वाहनांचा अपघात झाल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १०६(१-२) १० वर्षे तुरुंगवास आणि ७ लाख रुपये दंड (अजामीनपात्र) अशी शिक्षा देते. जर एखाद्या हिट अँड रन प्रकरणात चालक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे न जाता पकडला गेला. हा …

Read More »

सीमाप्रश्नात युवकांचा निर्धार महत्त्वाचा : प्रा. डॉ. अच्युत माने

  निपाणीत हुतात्म्यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नाचा साठ वर्षे लढा सुरू असून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यासह राज्यपालांची या प्रश्नावर चर्चा झाली आहे. कर्नाटकाची बाजू भक्कम असून महाराष्ट्रानेही आपली भूमिका ठामपणे बजावली आहे. त्यामुळे आता अखेरच्या टप्प्यात युवकांचा निर्धार महत्त्वाचा आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. …

Read More »

समाजाचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवा

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात समाजाचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या धार्मिक शक्तींवर लक्ष ठेवावे आणि खोट्या बातम्या पसरवून त्याचा लाभ उठविणाऱ्या शक्तींवर कठोर कारवाई करावी, अशा कडक सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील नृपतुंगा रोडवरील राज्य पोलिस मुख्यालयात आज …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची पोलिस प्रशासनासोबत चर्चा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी 2024 रोजी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात पोलीस खात्याच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीची आज सायंकाळी कॅम्प येथील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अरुण कुमार लोकूर आणि खडेबाजार पोलीस स्टेशनचे सीपीआय …

Read More »

कन्नड सक्तीच्या विरोधात शरद पवार यांना महाराष्ट्र एकीकरण समिती-शिवसेना निपाणी भाग यांच्याकडून निवेदन

  निपाणी (वार्ता) : मराठी भाषिक सिमावासीय न्यायाच्या प्रतिक्षेत गेली ६५ वर्षाहून आधिक काळ आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्राने हक्क सांगीतलेल्या ८६५ गावासाठी वैद्यकीय सह विविध क्षेत्रात अनेक योजनांचा लाभ सिमावासीयांना दिला होता. पण त्या विरोधात आता कन्नडीगांनी थयथयाट चालवला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारला याबाबत सूचना करून विविध योजनांचा …

Read More »