बेनाडी हायस्कूलमध्ये गुरुवंदना : शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या निपाणी (वार्ता) : ओळखलंस का मला?… सॉरी नाही ओळखलो!..अरे मी…अरे बापरे!, कसा ओळखणार? तू किती बदलायस! अरे तुला भेटून किती बरं वाटलं म्हणून सांगू…’ आणि मग कडकडून मिठी मारण्याचा प्रसंग बेनाडी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल मध्ये घडला. निमित्त होते, गुरुवंदना मित्रोत्सव कार्यक्रमाचे! …
Read More »येळ्ळूर मॉडेल शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार
येळ्ळूर : शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक आठ वाजता सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथील सहशिक्षिका सौ. एस्. एस्. बाळेकुंद्री यांना रोटरी क्लब ऑफ बेलगाम यांच्यामार्फत नेशन बिल्डर अवार्ड तसेच शाळेच्या कन्नड शिक्षिका श्रीमती एच्. आर. अरेर यांना सरकारी मराठी शिक्षक कल्याण संघ बेळगाव …
Read More »बेळगाव, खानापूर तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर
११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश बंगळूर : पहिल्या यादीत वगळण्यात आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या आधी राज्यातील १९५ तालुके दुष्ळग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. त्यात आता ११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे …
Read More »दोन टिप्पर-क्रूझर अपघात; ७ ठार
होस्पेट येथील दुर्घटना बंगळूर : दोन टिप्पर आणि क्रुझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट हद्दीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. भीमलिंगा, केंचव्वा, उमा, भाग्य, गोनीबसप्पा, अनिल आणि युवराज अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व मृत होस्पेट येथील उक्कडकेरी येथील आहेत. टिप्परचा एक्सल कापल्याने …
Read More »शिरगुप्पीत शेतामधील चंदनाच्या झाडाची चोरी
निपाणी (वार्ता) : सयाजीराव गणपतराव देसाई यांच्या शेतामध्ये २५ वर्षापूर्वी लावलेल्या चंदनाच्या झाडाची शिरगुप्पी (ता. निपाणी) येथे चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदर शेतकऱ्याने निपाणी शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सयाजीराव यांच्या सर्वे क्रमांक 141/1 मधील शेतात 25 वर्षे जुने चंदनाचे झाड होते. …
Read More »दुसऱ्या हप्त्यासाठी बेळगावात शेतकऱ्यांचा चाबुक मोर्चा
कारखाने बंद पाडण्याचा राजू शेट्टींचा इशारा बेळगाव (वार्ता) : साखरेचे दर वाढल्याने गतवर्षीच्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन चारशे रुपये, यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३८०० रुपये दर देण्यासह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून निदर्शने केली. संघटनेच्या मागण्या मान्य न …
Read More »हिंडलगा कारागृह उडवण्याची धमकी
बेळगाव : बेळगाव हिंडलगा कारागृह, बेंगळुरू कारागृह उडवून देण्याची धमकी देणारे फोन कारागृह विभागाचे उत्तर विभाग डीआयजीपी टी. पी. शेष यांना आल्याची माहिती मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हिंडलगा मध्यवर्ती कारागृह, बेळगाव, निवासी घरे बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. कारागृह विभागाचे उत्तर विभाग डीआयजीपी टी. पी. शेष …
Read More »अजित पवारांचा युक्तिवाद संपला, राष्ट्रवादीची पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेली आजची सुनावणी संपली आहे. या पुढची सुनावणी ही 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादीत आतापर्यंत लोकशाही मार्गाने काम होत नव्हतं, शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. ज्या लोकांची शरद पवारांनी …
Read More »पुलाचे बांधकाम न थांबविल्यास तीव्र आंदोलन
कुर्ली परिसराला पुराचा धोका : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर यमगर्णी जवळील वेदगंगा नदीवर पूल मंगुर फाट्यावर नवीन उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. पुलासह दोन्ही बाजूला कच्चा मुरूम टाकला जात आहे. येथे पूल बांधल्यास पावसाळ्यात कुर्लीसह परिसरातील गावांना …
Read More »कर्णबधीर, मतिमंद मुलांसोबत साजरा केला मुलींचा वाढदिवस; स्नेहभोजनाचीही मेजवानी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संगीता शिवानंद चिक्कमठ त्यांच्या दोन्ही मुली अंकिता व अर्पिता यांचा वाढदिवस कर्णबधीर मुलांसोबत साजरा करत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निपाणीतील सावंत कॉलनीतील नितीनकुमार कदम कर्णबधीर विद्यालय येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नामदेव चौगुले हे होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta