खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायतने वरील तक्रारीची दखल घेऊन ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लपा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी पंचायत मेंबर व ग्रामस्थांची मिटिंग घेण्यात आली
या मिटिंगमध्ये आता पावसात साचलेले पाणी पाहून त्वरित उपाय योजना तयार करून पाणी काढण्याचे आदेश खानापूर तालुका पंचायत अधिकारी प्रकाश हल्लान्नावर यांनी पंचायत विस्तीर्ण अधिकारी नागप्पा बन्नी यांना सांगितले.
या मिटिंगमध्ये मराठा मंडळ बेकवाड हायस्कूलचे शाळा सुधारणा कमिटीचे चेअरमन धनाजी आंबेवाडकर, गावातील पंच कमिटीचे चेअरमन मारुती पाटील, सेक्रेटरी शिवराम पाटील, पी. के. पी. एस. चेअरमन महादेव पाटील, पंचायत सदस्य संजीव कोलकार, मुजावर गावातील नागरिक मारुती तलवार, पी. के. पी. एस. माजी सेक्रेटरी नामदेव पाटील, मारुती पाटील, माऱ्याप्पा पाटील, यल्लापा पाटील, विठ्ठल पाटील, नामदेव केसरेकर, नामदेव गुरव, मंजुनाथ पाटील, कौसल्या बाळेकुंद्री, रुक्माना पाटील, शालन गुरव आदी नागरिक उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …