बेळगाव : माळी गल्ली, बेळगाव येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ यांच्यावतीने किल्ला तलावनजीकच्या तसेच रेल्वे स्थानकानजीकच्या झोपडपट्टीतील गरीब आणि गरजूंसह जुन्या घाऊक भाजीमार्केट नजीकच्या गरजूंना अन्न वाटप करण्यात आले. बालाजी फूट वेअरचे संचालक हरीश, महालक्ष्मी स्टील सेंटरचे मालक, राजू शहापूरकर, मदन मोदगेकर, प्रदीप दरवंदर, गौरव कल्याणकर, पिंटू बडस्कर, विकी मेडिकलचे मालक, संतोष राजगोळकर, सोमनाथ हलगेकर यासह हरिशचंद मेहता आदी माळी गल्ली, कामत गल्ली आणि पांगुळ गल्ली येथील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून अन्नदानाचा हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे शंभरहून अधिक गरजूंना यावेळी अन्न पाकिटे वितरीत करण्यात आली. रविवारी लॉकडाऊनदिनी हा उपक्रम राबविण्यात आल्याने अन्न पाकिटांचा लाभ घेतलेल्या गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
माळी गल्ली मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, विनोद लोहार, प्रभाकर बामणेकर, बसवराज नेसरगी, अशोक कदम, प्रतीक बंडमजी, भूषण हेब्बाळकर, भाऊराव चौगुले, अभिजीत लंगरकांडे, सचिन कदम, मिलिंद बामणेकर, रवींद्र जाधव यांनी अन्न पाकिटांचे वितरण केले.