बेळगाव जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस समितीच्यावतीने निवेदन
बेळगाव : कोरोना सावटात लॉकडाऊनमुळे असंघटित कामगारांसमोर उदरनिर्वाहाची मोठी बिकट समस्या निर्माण झाली आहे. कामधंद्याअभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असंघटित कामगार आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून असंघटित कामगारांसाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस समितीच्यावतीने बेळगाव जिल्हा प्रशासनाकरवी सदर मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस असंघटित कामगार समितीचे अध्यक्ष शशिधर चिकोडी यांनी निवेदनाची प्रत जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस लेबर सेलचे अध्यक्ष मंजू कांबळे, जिल्हा कॉंग्रेस कायदा विभागाचे अध्यक्ष विजय गेज्जी उपस्थित होते.