हेल्प फॉर निडीकडून अंत्यसंस्कार

बेळगाव : बागलकोट येथील गीता अशोक नार्गुंद (वय 74) या त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुले नसल्याने गेले एक वर्षापासून सावली वृद्धाश्रमामध्ये राहत होत्या. त्यांचे आज सकाळी 11.30 वाजता वृद्धाकाळाने वृद्धाश्रमामध्ये निधन झाले.
त्यांचा अंत्यसंस्कार हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्या मदतीने डॉ. जयवंत पाटील यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीत केला.
या प्रसंगी अनिल अष्टेकर, भारत नग्रोळी व निलेश पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta